33 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेष ‘द केरळ स्टोरी’ बघण्यासाठी थिएटर तुडुंब, जमवला ११२ कोटींचा गल्ला

 ‘द केरळ स्टोरी’ बघण्यासाठी थिएटर तुडुंब, जमवला ११२ कोटींचा गल्ला

हा सिनेमा भारतासह अमेरिका आणि कॅनडामध्येही प्रदर्शित

Google News Follow

Related

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून बरेच वाद निर्माण झाले. एवढ्या वादातही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाने दणक्यात सुरुवात केली होती आणि तेव्हापासून हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. आता दुसऱ्याच आठवड्यात हा चित्रपट १०० कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. ‘द केरळ स्टोरी’नेही शनिवारी बॉक्स ऑफिसवर १९.५० कोटींची कमाई केली. त्यामुळे या चित्रपटाची एकूण कमाई आता ११२.८७ कोटी रुपये झाली आहे.
हा सिनेमा भारतासह अमेरिका आणि कॅनडामध्येही प्रदर्शित झाला होता. परदेशी प्रेक्षकांच्याही पसंतीस हा सिनेमा पडला आहे. केरळ स्टोरी शुक्रवारी अमेरिका आणि कॅनडामध्ये २०० हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. परदेशातही या सिनेमागृहा बाहेर हाउसफूलच्या पाट्या दिसत आहेत.
केरळमधील मुलींचे धर्मांतर, त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यानंतर इसिससारख्या दहशतवादी संघटनेची कहाणी यावर आधारीत बनवलेला हा चित्रपट आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला. पश्चिम बंगाल सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे. तर तामिळनाडूत चित्रपटगृहात प्रेक्षक नसल्याचे कारण देत या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले आहेत. तर मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात हा चित्रपट करमुक्त झाला आहे. त्याचबरोबर चित्रपटाविषयी चित्रपटगृहांमध्ये तेच वातावरण आहे, जे गेल्या वर्षी ‘द काश्मीर फाइल्स’च्या वेळी पाहिले आहे. हा चित्रपट मुंबई, दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, हरियाणा, आंध्र/निजाम, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक कमाई करताना हा चित्रपट दिसत आहे.

हेही वाचा : कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास

द केरळ स्टोरी’ यांसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची प्रथा जुनीच !

नवऱ्याने वऱ्हाडींसाठी चिकनचा धरला आग्रह आणि लग्न मोडले, वधूने मग धडा शिकवला!

गोल्डन बूट पुरस्कार विजेत्या अंध फुटबॉलपटूला बलात्कारप्रकरणी तुरुंगवास

सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि लिखित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात तीन बिगर मुस्लिम महिलांची कथा आहे. ज्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना इसिस या दहशतवादी संघटनेत सामील करण्यात आले होते. या चित्रपटात अदा शर्मासह योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्याही भूमिका आहेत. वादाच्या भोवऱ्यात हा चित्रपट ५ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.
शाहरुख खानचा ‘पठाण’, रणबीर कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ आणि सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ नंतर २०२३ मध्ये कमाईचे शतक झळकावणारा ‘द केरळ स्टोरी’ हा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट ४० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा