31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरराजकारणकर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास

कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास

भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला विकासाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचविण्यात आलेले अपयश पराभवास कारणीभूत ठरले.

Google News Follow

Related

कर्नाटक विधानसभा निवडणूक एकूण जागा २२४ काँग्रेस १३६ भाजपा ६५ जनता दल (एस) १९ इतर ४ कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार कामगिरी करत १३६ जागांवर विजय मिळवत पूर्ण बहुमत जिंकले. मात्र भारतीय जनता पक्षाला ६५ जागांवर समाधान मानावे लागले.  

स्थानिक विकास, भ्रष्टाचार, मुस्लिम धर्मियांसाठी आरक्षण, बजरंग दलावर बंदी, भाजपाचे अंतर्गत राजकारण अशा विविध मुद्द्यांचा या निवडणुकीत प्रभाव पडला. काँग्रेसने बजरंग दलावरील बंदीची घोषणा त्यांना अपेक्षित परिणाम देणारी ठरली तर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला विकासाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचविण्यात आलेले अपयश पराभवास कारणीभूत ठरले.  

मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळविण्यासाठी काँग्रेसने बजरंग दलावर बंदीची घोषणा केल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात आला. शिवाय, मुस्लिमांच्या धार्मिक आरक्षणाला भाजपाने विरोध केला होता, त्याचाही फायदा काँग्रेसला मिळाल्याचे म्हटले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते कर्नाटकमध्ये प्रचारासाठी आले होते, पण मावळत्या भाजपा सरकारच्या कामांतील उणीव पक्षाला पराभूत करणारी ठरली.  

कर्नाटक निवडणूक निकालानंतर आता काँग्रेसमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत तसेच नव्या सरकारमध्ये तीन उपमुख्यमंत्री असतील असेही म्हटले जात आहे. जनता दल सेक्युलर या पक्षाला मात्र यावेळी १९ जागांवरच समाधान मानावे लागले. त्यांना गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मोठा फटका बसला. भाजपाला मात्र यावेळीही मतांची तेवढीच टक्केवारी मिळाली पण ४० जागा गमवाव्या लागल्या. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत ८० जागा मिळाल्या होत्या, त्यात त्यांना भरघोस वाढ मिळाली.

हे ही वाचा:

उत्तरप्रदेशात सगळे महापौर भाजपाचे तर ९९ नगराध्यक्ष

बृजभूषण सिंह यांचे कुस्ती महासंघ अध्यक्षपद गेले!

ठाकरे पुन्हा शेंडी-जानव्याला शरण! शिंगणापूरचा, शनी बळ देईल काय?

चीनमध्ये एक लाखाहून अधिक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई

या निकालांमुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सर्वाधिक आनंद झाल्याचे दिसले. संजय राऊत यांनी महाराष्ट्रात याचे परिणाम दिसतील आणि १७५ ते १८० जागा महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र सगळे ९ उमेदवार पराभूत झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया ऐकून बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी खिल्ली उडविली.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे या विजयाबद्दल ट्विटरवरून अभिनंदन केले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्यांना यश मिळावे, अशा शुभेच्छा. या शब्दांत पंतप्रधानांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गरीबांच्या शक्तीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. द्वेषाचे दुकान बंद झाले असून प्रेमाचे दुकान उघडले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. भाजपाचे मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा