31 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरविशेषबृजभूषण सिंह यांचे कुस्ती महासंघ अध्यक्षपद गेले!

बृजभूषण सिंह यांचे कुस्ती महासंघ अध्यक्षपद गेले!

दीड महिन्यात होणार निवडणुका

Google News Follow

Related

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. आयओएचे सचिव कल्याण चौबे यांनी कुस्ती महासंघासाठी आदेश जारी करत सर्व पदाधिकाऱ्यांना आर्थिक व प्रशासनिक कामापासून दूर राहण्याचे आदेश दिले आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून सध्या वादात सापडलेले बृजभूषण सिंह यांचा कार्यकाळ आधीच संपुष्टात आला होता. पण आता त्यांना निवडणूक लढविता येणार नाही. क्रीडाधोरणानुसार त्यांना आता पुन्हा निवडणुकीत सहभागी होता येणार नाही. सगळ्या पदाधिकाऱ्यांवर निर्बंध घातल्यामुळे बृजभूषण यांचे अध्यक्षपदही गेले आहे.

 

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप प्रमुख कुस्तीगीरांनी केले आहेत. सध्या त्यावरून या खेळाडूंचे जंतर मंतर येथे आंदोलन सुरू आहे. बृजभूषण यांना तात्काळ अटक करावी अशी त्यांची मागणी आहे.
कुस्ती महासंघाच्या निवडणुका येत्या ४५ दिवसांत घेण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत. ३ मे रोजी यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून त्यात वुशूचे भूपेंदर सिंह, ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरूर व निवृत्त न्यायाधीशांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

कर्नाटकमध्ये भाजपाची फक्त ०.४ टक्के मते कमी झाली

बनावट नोटा प्रकरणी एनआयएकडून मुंबईत एकाला अटक; शस्त्रसाठा जप्त

चीनमध्ये एक लाखाहून अधिक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई

भारताची परकीय चलन गंगाजळी ५७२ अब्ज डॉलरवर

 

बृजभूषण यांच्याविरोधात काही प्रमुख कुस्तीगीर आंदोलन करत असताना त्याला आता बाहेरच्या संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे बृजभूषण यांच्याविरोधात कारवाई सुरू असतानाही आंदोलन सुरू आहे. बृजभूषण यांना कोणत्याही परिस्थितीत अटक करा अशी खेळाडूंची मागणी आहे. तर सध्या दिल्ली पोलिसांनी नोंदविलेल्या एफआयआरवर बृजभूषण यांच्यावर कारवाई सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
76,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा