27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरक्राईमनामाबनावट नोटा प्रकरणी एनआयएकडून मुंबईत एकाला अटक; शस्त्रसाठा जप्त

बनावट नोटा प्रकरणी एनआयएकडून मुंबईत एकाला अटक; शस्त्रसाठा जप्त

१२ तलवारी केल्या जप्त

Google News Follow

Related

एनआयएने बनावट नोटा प्रकरणात आणखी एकाला शस्त्रासाठ्यासह अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडून १२ तलवारी जप्त करण्यात आलेल्या असून या सर्व प्रकरणात ही तिसरी अटक असल्याचे एनआयए ने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मो. फयाज शिकीलकर असे अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव आहे. फयाज याला मुंबईतून अटक करण्यात आली असून फयाज हा बनावट नोटा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रियाज आणि नासिर यांच्या संपर्कात होता.

एनआयएच्या तपासात असे दिसून आले की, आरोपी बनावट नोटा चलनाच्या रॅकेटच्या संबंधात डी-कंपनीच्या संपर्कात होता. नोव्हेंबर २०२१मध्ये ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत रियाज आणि नासिर या दोघांना बनावट नोटा प्रकरणात अटक करण्यात आली होती.

नासिर आणि रियाज हे दोघे न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणाशी डी-कंपनीचा थेट सबंध असल्याचे समोर आल्यानंतर एनआयए ने फेब्रुवारी २०२३ मध्ये वेगळा गुन्हा दाखल करून बुधवारी नासिर आणि रियाज याच्या घरी आणि कार्यालयत असे एकूण ६ ठिकाणी छापेमारी केली होती. दरम्यान एनआयए ला महत्वाचे कागदपत्रे ल,डिजिटल उपकरणे, शस्त्र इत्यादी मिळून आले होते.

हे ही वाचा:

ठाकरे पुन्हा शेंडी-जानव्याला शरण! शिंगणापूरचा, शनी बळ देईल काय?

उत्तरप्रदेशात सगळे महापौर भाजपाचे तर ९९ नगराध्यक्ष

कर्नाटकमध्ये भाजपाची फक्त ०.४ टक्के मते कमी झाली

तुरुंगात कैदी फोन वापरताना दिसला तर तुरुंग कर्मचाऱ्याला शिक्षा

या गुन्ह्याचा तपास एनआयए कडून करण्यात येत होता, दरम्यान शुक्रवारी एनआयए ने मोहम्मद फयाज शिकीलकर याला अटक करून त्याच्याजवळून १२तलवारी जप्त केल्या आहेत. शिकीलकर हा नासिर आणि रियाज यांच्या थेट संपर्कात होता अशी माहिती समोर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा