33 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेष‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’च्या आयुष्याची कहाणी उलगडणार मोठ्या पडद्यावर

‘गडकरी’ सिनेमा २७ ॲाक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या आयुष्याचा उलगडा लवकरच रुपेरी पडद्यावर होणार आहे. त्यांचे आयुष्य आणि राजकीय कारकीर्द लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

अक्षय अनंत देशमुख हे या ‘गडकरी’ सिनेमाचे निर्माते असून या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारेल? या प्रमुख भूमिकेत कोणाला पाहायला मिळाणार आहे हे प्रश्न सध्या अनुत्तरीत असून यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

 “नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक अशा या त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध बाजू जनतेला माहित आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे,’’ असे दिग्दर्शक अनुराग भुसारी यांनी सांगितले. २७ ॲाक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे ही वाचा:

गतविजेत्या इंग्लंडची अपयशी सलामी

संजय सिंह यांची अटक वॉरंटशिवाय अथवा कारणाशिवाय नाही

खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्या धाकट्या भावाला समन्स

लेझर लाईटनंतर डीजेच्या आवाजामुळे पोलिसांना कानाचा त्रास

या चित्रपटाच्या निर्मितीची सुरुवात २०१९ मध्ये झाली होती. दरम्यान, करोना काळात चित्रपटाचे काम थांबले होते. या चित्रपटासाठी नितीन गडकरी यांच्याविषयी सगळी माहिती ही त्यांचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून घेण्यात आली आहे. राजकीय मुद्दा चित्रपटात न मांडता तरुणांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रेरणा मिळावी यादृष्टीने सिनेमा बनवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी यांचे स्वतःचे कोणतेही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसताना त्यांनी राजकारणात स्वत:चं स्थान मिळवलं.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा