24 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरविशेषबहुप्रतिक्षित आयफोन १७ सिरीज भारतात लाँच; काय आहेत फीचर्स?

बहुप्रतिक्षित आयफोन १७ सिरीज भारतात लाँच; काय आहेत फीचर्स?

तीन फोन लाँच

Google News Follow

Related

बहुप्रतिक्षित अशी आयफोन १७ सिरीज अखेर लाँच झाली आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवनवीन वैशिष्ट्ये असलेल्या ऍपलच्या आयफोन १७ चे अनावरण करण्यात आले. या सीरिजमध्ये आयफोन १७ प्रो आणि प्रो मॅक्स यासारखे प्रीमियम मॉडेल्स आहेत. तसेच आयफोन एअर सारखे नवीन मॉडेलही यात आहेत.

अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवनवीन वैशिष्ट्ये असलेल्या ऍपलच्या आयफोन १७ चे अनावरण करण्यात आले. यात 6.3 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. अ‍ॅपलने पहिल्यांदाच बेस मॉडेलमध्ये 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट दिला आहे. पीक ब्राइटनेस 3000 निट्सपर्यंत आहे. फोनमध्ये A19 पिचर आहे. एसआरएएम शील्ड 2 चे संरक्षण डॅशप्लेमध्ये असेल. फोन २० मिनिटांत हे ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होईल, असा दावा केला जात आहे. यात व्हिज्युअल इंटेलिजन्स फीचर असेल. भाषांतराची थेट सुविधा उपलब्ध असेल. तसेच बॅटरी लाईफ चांगली मिळेल.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर आयातशुल्क लागू केल्यानंतर आयफोनवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र कंपनीने आयफोनच्या किंमतीत फार वाढ न करता ग्राहकांना दिलासा दिला आहे.

आयफोन १७ ची किंमत २५६ जीबी साठी ८२,९०० रुपये आहे. आयफोन एअर हे नवीन मॉडेल २५६ जीबी साठी १,१९,९०० रुपयांत मिळेल. बारीक डिझाइन आणि चांगल्या फीचर्ससह हा फोन वजनाने हलक्या फोनच्या सिरीजमध्ये चांगला आहे. आयफोन १७ प्रो आता २५६ जीबी स्टोरेजसह सुरू होऊन त्यात ५१२ जीबी आणि एक टीबी असे पर्यायही आहेत. तसेच नवे रंग कोस्मिक ऑरेंज, डीप ब्लू आणि सिल्व्हर उपलब्ध झाले आहेत. भारतात याची किंमत १,३४,९०० रुपये आहे.

हे ही वाचा : 

पाक, श्रीलंका, बांगालादेश अन आता नेपाळ; भारताच्या शेजाऱ्यांकडे सत्तापालटाची हवा!

“नेपाळमध्ये हिंसाचार शिगेला; पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत?”

रशियन बॉम्बिंगमध्ये २० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू

काठमांडू विमानतळ बंद; इंडिगो, एअर इंडियाकडून उड्डाणे रद्द

आयफोन १७ प्रो मॅक्समध्ये २५६ जीबी ते दोन टीबी पर्यंतचे स्टोरेज मिळणार आहे. भारतात याची किंमत १,४९,९०० रुपयांपासून सुरू आहे. ४८ मेगापिक्सेलचा कॅमेरा, जास्तकाळ टिकणारी बॅटरी आणि AI फीचर्स यामुळे हा फोन उत्तम आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा