ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील एशेज मालिकेची सुरुवात १८८२-८३ मध्ये झाली. तब्बल दीडशे वर्षांच्या इतिहासात अनेक विक्रम झाले, पण एक सामना असा झालाय जो आजही अविश्वसनीय मानला जातो – कारण त्या सामन्यात इंग्लंडने एका डावात नऊशेहून अधिक धावा केल्या होत्या!
हा ऐतिहासिक सामना ऑगस्ट १९३८ मध्ये द ओव्हल मैदानावर खेळला गेला.
इंग्लंडची पहिली आणि एकमेव डाव – ९०३/७ (घोषित)
टॉस जिंकून इंग्लंडने फलंदाजी निवडली आणि तब्बल ३३५.२ षटकं खेळत संघाने
९०३ धावा करून ७ बाद अशी पारी घोषित केली.
२९ धावांवर पहिला विकेट गेल्यानंतर लिओनार्ड हटन आणि मॉरिस लेलंड यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३८२ धावांची भागीदारी केली.
लिओनार्ड हटनचा अविश्वसनीय पराक्रम – ३६४ धावा
हटनने ८४७ चेंडू खेळले, ३५ चौकार मारले आणि ३६४ धावा करून बाद झाला – हा तेव्हाचा जागतिक विक्रम होता.
इतर प्रमुख फलंदाज:
-
मॉरिस लेलंड – १८७ धावा (१७ चौकार)
-
वॉली हॅमंड – ५९ धावा
-
जो हार्डस्टाफ – १६९ धावा नाबाद
ऑस्ट्रेलियाकडून बिल ओ’रेलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियाची निराशाजनक कामगिरी
पहिला डाव:
-
ऑस्ट्रेलिया – २०१ धावा
-
सर्वाधिक धावा: बिल ब्राउन – ६९
इंग्लंडकडून:
-
बिल बोवेस – ५ विकेट्स
फॉलोऑननंतर दुसरा डाव:
-
ऑस्ट्रेलिया – १२३ धावा
-
इंग्लंडकडून केन फर्नेस – ४ विकेट्स
निकाल:
इंग्लंडने पारी आणि ५७९ धावांनी विजय मिळवला
(क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रचंड विजयांपैकी एक)







