27 C
Mumbai
Sunday, July 21, 2024
घरविशेषभारत खेळणार बांग्लादेश, न्यूझीलंडविरोधात कसोटी मालिका

भारत खेळणार बांग्लादेश, न्यूझीलंडविरोधात कसोटी मालिका

देशात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सन २०२४-२५मध्ये देशात खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. याची सुरुवात सप्टेंबरमध्ये होईल. भारत यावेळी बांगलादेशसोबत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार असून त्यानंतर धरमशाला, दिल्ली आणि हैदराबाद येथे टी२० मालिका खेळेल.

बांगलादेशविरुद्ध खेळल्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत सज्ज असेल. ही मालिका १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरूमध्ये सुरू होईल. त्यानंतर पुणे आणि मुंबईत उर्वरित दोन सामने होतील. नवीन वर्ष सुरू होतानाच इंग्लंड भारताच्या दौऱ्यावर येईल. येथे ब्रिटनचा संघ पाच टी २० सामने खेळेल. त्यानंतर त्यांच्यात तीन एकदिवसीय सामनेही रंगतील. चेन्नई, कोलकाता, राजकोट, पुणे आणि मुंबईत एकदिवसीय सामने रंगतील. तर, नागपूर, कटक आणि अहमदाबाद येथे एकदिवयसीय सामने रंगतील. हा दौरा १२ फेब्रुवारी रोजी संपेल.

बांगलादेशविरोधात पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबर रोजी चेन्नईत रंगेल. त्यानंतर दोन्ह संघ दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळण्यासाठी कानपूरला प्रयाण करतील. हा सामना २७ सप्टेंबर रोजी होईल. यावेळी भारतीय संघ नव्या संघ व्यवस्थापनाखाली लढत देईल. सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड तोपर्यंत पदावरून पायउतार झालेले असतील.

बांगलादेशविरोधातील तीन टी२० सामने ६ ऑक्टोबर, ९ ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबरला होतील. त्यानंतर तीन दिवसांतच न्यूझीलंडविरोधातील मालिकेला सुरुवात होईल. न्यूझीलंडचा संघ केवळ तीन कसोटी सामन्यांसाठी भारतात दाखल होणार आहे. पहिला कसोटी सामना १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान बेंगळुरूमध्ये होणार आहे. दोन्ही संघ त्यानंतर महाराष्ट्रात दाखल होतील. त्यातील दुसरा सामना पुण्यात २४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान तर, तिसरा आणि शेवटचा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत होईल.

हे ही वाचा:

सुपर ८ ची विजयी सुरुवात; भारताचा अफगाणिस्तानवर विजय

दक्षिण मुंबईमधून दोन बांगलादेशी महिलांना अटक

‘डार्कनेटमधून फुटली होती यूजीसी-नेटची प्रश्नपत्रिका’

राजभवनात सध्याच्या कोलकाता पोलिसांच्या ताफ्यात मी सुरक्षित नाही!

देशातील क्रिकेटचा हा हंगाम संपेल तो इंग्लंडविरोधातील मर्यादित षटकांच्या मालिकेने. दोन्ही संघांमध्ये पाच टी २० आणि तीन एकदिवसीय सामने होतील. टी २० सामन्यांची सुरवात २२ जानेवारीला होईल.

  • २२ जानेवारी – पहिला टी २० सामना, चेन्नई
  • २५ जानेवारी – दुसरा टी २० सामना, कोलकाता
  • २८ जानेवारी – तिसरा टी २० सामना, राजकोट
  • ३१ जानेवारी- चौथा टी २० सामना, पुणे
  • २ फेब्रुवारी – पाचवा टी २० सामना, पुणे
  • ६ फेब्रुवारी – पहिला एकदिवसीय सामना, नागपूर
  • ९ फेब्रुवारी – दुसरा एकदिवसीय सामना, कटक
  • १२ फेब्रुवारी- तिसरा एकदिवसीय सामना, अहमदाबाद
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा