28 C
Mumbai
Wednesday, February 11, 2026
घरविशेषऑपरेशन सिंदूर" ची यशस्विता बाबा विश्वनाथांच्या चरणी अर्पण

ऑपरेशन सिंदूर” ची यशस्विता बाबा विश्वनाथांच्या चरणी अर्पण

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी वाराणसीमध्ये आले. बनौली येथील जाहीर सभेत, त्यांनी काशीशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचा उल्लेख केला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाबद्दल बाबा विश्वनाथांचे आभार मानले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काशीचे माझे स्वामी म्हणजे जनता-जनार्दन आहेत. सावनचा महिना, काशीचं पावन स्थान, आणि देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद – यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं? आज मी ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदा काशीमध्ये आलो आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये एक भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. त्या वेळी २६ निरपराध लोकांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांचा दु:ख, मुलांचं आक्रंदन, मुलींचा आक्रोश – यामुळे माझं हृदय फार वेदनेत होतं. तेव्हा मी बाबा विश्वनाथांकडे प्रार्थना केली होती की, पीडित कुटुंबांना हा दु:ख सहन करण्याचं बळ मिळो.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, माझ्या मुलींच्या सिंदूराचा सूड घेण्याचं मी जे वचन दिलं होतं, ते मी पूर्ण केलं आहे. हे महादेवांच्या आशीर्वादानेच शक्य झालं. ‘ऑपरेशन सिंदूर’ची यशस्विता मी बाबा विश्वनाथांच्या चरणी अर्पण करतो. या आधी, पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात काशीतील प्रत्येक कुटुंबाला प्रणाम करून केली. नमः पार्वती पतये, हर हर महादेव!” अशा घोषणेने भाषणाची सुरुवात करत त्यांनी भोजपुरीत म्हटलं, सावन के पावन महीना में आज हमके काशी के हमरे परिवार के लोगन से मिलय का अवसर मिलल हय। हम काशी के हर परिवार जन के प्रणाम करत आहे.

हेही वाचा..

नॅशनल हेराल्ड प्रकरण : पुढील सुनावणी १८ ऑक्टोबरला

‘भारत रशियाकडून तेल खरेदी करत आहे’

‘राधे राधे’च्या अभिवादनाने खवळले मुख्याधापक, विद्यार्थिनीला दिली शिक्षा!

मल्याळम अभिनेता कलाभवन नवस कोचीच्या हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळले!

यावेळी पंतप्रधानांनी काशीमध्ये २,२०० कोटी रुपयांचे ५२ प्रकल्प सुरू केले. तसेच देशभरातील ९.७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ची २०वी हप्ताही (२०,५०० कोटी रुपये) वितरित केली. दालमंडी प्रकल्पाचं भूमिपूजन देखील त्यांनी केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बनौली येथील जनसभेत त्यांचे स्वागत केले. योगी म्हणाले, ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधानांचा काशीमध्ये आगमन झालं आहे. पहलगाममधील दहशतवाद्यांना जमिनीत गाडून, शत्रूच्या घरात घुसून त्यांचा नाश करणं – हेच नवीन भारताचं वैशिष्ट्य आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा