29.4 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरविशेष‘हमारा बजाज’ मागील आवाज हरपला! गायक विनय मांडके यांचे निधन

‘हमारा बजाज’ मागील आवाज हरपला! गायक विनय मांडके यांचे निधन

वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Google News Follow

Related

गेली अनेक वर्षे आपल्या गाण्यांनी आणि जिंगल्समधून रसिकांच्या मनात घर करणारे गायक विनय मांडके यांचे निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी विनय मांडके यांनी दादरमधील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. मांडके यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

विनय मांडके यांनी हजारो जाहिरातींसाठी आवाज दिला होता. ‘हमारा बजाज’सारखी जिंगल आजही लोकांच्या लक्षात असून त्यामागचा प्रभावी आवाज विनय मांडके यांचाच होता. त्यांनी सुमारे सात हजारांपेक्षा जास्त जिंगल्स आणि अनेक चित्रपटांसाठी गायन केले होते. विशेष म्हणजे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक गाणी गायली होती. त्यामुळेच त्यांना “लक्ष्याचा आवाज” अशी एक वेगळी ओळख मिळाली होती. लाइव्ह ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमांमधूनही विनय मांडके यांनी संगीतप्रेमींना आनंद देत विशेष ओळख निर्माण केली.

हे ही वाचा:

“माझ्या मौनाला पराभव समजू नका…” उपनेतेपदावरील हकालपट्टीनंतर राघव चड्ढा काय म्हणाले?

भारताची तिसरी अणु पाणबुडी INS अरिदमन लवकरच नौदलाच्या ताफ्यात

रशियाकडून अधिक तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्याचा भारताला प्रस्ताव

पाकिस्तानमध्ये डिझेल ५२० आणि पेट्रोल ४५८ रुपये लिटर

विनय मांडके यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले. पुढे जाहिरात क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीत त्यांनी सातत्याने काम करत स्वतःची ओळख अधिक मजबूत केली. ‘ये जमीं ये आसमां…’, ‘कलभी आजभी, आजभी कलभी’ ‘जो ओके साबुनसे नहाये, कमलसा खिल जाये’ यासारख्या जवळपास चार हजारांहून जास्त जाहिरात गीतं-जिंगल्स त्यांनी गायले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा