दिल्ली उच्च न्यायालयाने ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटाविरोधात दाखल केलेली जनहित याचिका (पीआयएल) फेटाळून लावली आहे. या याचिकेत असा आरोप करण्यात आला होता की, चित्रपटात इतिहासाचे विकृतीकरण केले गेले आहे आणि त्याच्या प्रदर्शनामुळे देशात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते. दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका कलात्मक स्वातंत्र्यात (Artistic Freedom) हस्तक्षेप करण्याचा अनावश्यक प्रयत्न असल्याचे सांगत फेटाळली. न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनास पाठिंबा दर्शविला.
आयएएनएसला दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने म्हटले की “रचनात्मक अभिव्यक्तीला ठोस पुरावा नसताना मर्यादित केले जाऊ शकत नाही.” त्यामुळे ‘द ताज स्टोरी’चा प्रदर्शन रोखण्यास नकार देण्यात आला आहे. ही याचिका दिल्लीतील वरिष्ठ वकील शकील अब्बास यांनी दाखल केली होती. यात चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेते परेश रावल यांना पक्षकार करण्यात आले होते. तसेच केंद्र सरकार आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) यांनाही पक्षकार करण्यात आले होते.
हेही वाचा..
‘सूर्या’ पुन्हा तळपला — १५० षटकारांचं सूर्यमंडळ उजळलं!
कायद्याला आव्हान देणाऱ्याला परिणाम भोगावा लागेल
जो जनावरांचा चारा खातो, तो माणसाचे हक्कही गिळतो
आयसीसी एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत रो‘हिट’!
याचिकाकर्त्याचा दावा होता की, चित्रपटात ताजमहाल आणि त्याच्याशी संबंधित ऐतिहासिक माहिती चुकीच्या प्रकारे सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे जनतेत गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि धार्मिक किंवा सांप्रदायिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. या आरोपांना उत्तर देताना चित्रपटाचे दिग्दर्शक तुषार अमरीश गोयल म्हणाले, “‘द ताज स्टोरी’ हा चित्रपट कल्पनेवर किंवा अफवांवर आधारित नाही. तो आमच्या टीमने सहा महिन्यांच्या सखोल संशोधन, सल्लामसलत आणि सत्यापित ऐतिहासिक संदर्भांच्या आधारे तयार केला आहे. सीबीएफसीने चित्रपटातील प्रत्येक बाब तपासून, त्याच्या प्रामाणिकतेबद्दल पूर्ण समाधान झाल्यानंतरच मंजुरी दिली आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमचा हेतू कधीच सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा नव्हता, तर एका संशोधनाधारित दृष्टीकोनातून इतिहासाकडे पाहण्याचा होता. दिल्ली उच्च न्यायालयाने आमच्या चित्रपटाला पाठिंबा देत रचनात्मक स्वातंत्र्याचे संरक्षण केले, याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. सिनेमा हा सत्य, संशोधन आणि निर्भय कथनाचे माध्यम राहावे, हेच आमचे ध्येय आहे.” ‘द ताज स्टोरी’ या चित्रपटात परेश रावल, जाकीर हुसेन, अमृता खानविलकर, स्नेहा वाघ आणि नमित दास यांसारखे कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट ३१ ऑक्टोबरला देशभर प्रदर्शित होणार आहे.







