27 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषयंदाचा केशवसृष्टी पुरस्कार गीता शहा यांना जाहीर

यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार गीता शहा यांना जाहीर

Google News Follow

Related

यंदाचा केशवसृष्टी पुरस्कार ठाण्याच्या विद्यादान सहाय्यक मंडळाच्या संस्थापक आणि विश्वस्त श्रीमती गीता शहा यांना जाहीर झाला आहे. केशवसृष्टी पुरस्काराचे हे १६ वे वर्ष आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ येत्या ११ ऑक्टोबर रोजी ठाणे येथे होणार आहे. बृहन्मुबई महापालिकेच्या उप आयुक्त ( शिक्षण ) डॉ. प्राची जांभेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गीता शहा ह्यांनी ग्रामीण भागातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा शिक्षणाद्वारे सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने हे काम सुरू केले. सक्षम विद्यार्थी – सक्षम राष्ट्र या ब्रीद वाक्याने त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. काही सहकारी आणि कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन त्यांनी १५ ऑगस्ट २००८ रोजी विद्यादान ह्या संस्थेची मुहुर्तमेढ रोवली. गरीबी आणि घरातील प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी मनात असूनही शिक्षणापासून वंचित राहतात. अश्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची जवाबदारी ही संस्था घेते. केवळ शिक्षणच नाही तर त्यांचा मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक अश्या सर्व प्रश्नांची जवाबदारी ही संस्था घेते. त्यांना समाजात सक्षम पणे उभे करते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक सुज्ञ पालक, मार्गदर्शक निवडला जातो. तो ह्या मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याची सर्व जवाबदारी घेतो.

हेही वाचा..

‘आय लव्ह मोहम्मद’ नंतर, ‘आय लव्ह पिग’चे झळकले पोस्टर!

अमेरिकन नागरिकाच्या तक्रारीवर ईडीची कारवाई

फोनपे, मास्टरकार्ड करणार डिव्हाइस टोकनायझेशन लॉन्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय महाराष्ट्र दौर्‍यावर

आज असे ५०० पालक – मार्गदर्शक कार्यरत आहेत. मुलांचा शैक्षणिक खर्च, त्यांची निवासी व्यवस्था, त्यांच्या जेवणाचा खर्च , त्यांचा वैद्यकीय खर्च संस्थेतर्फे केला जातो. आजपर्यंत असंख्य विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवला आहे. त्यामध्ये डॉक्टर, अभियंते, परिचारक, तंत्रज्ञ, वकील, सनदी लेखापाल, कला दिग्दर्शक, वास्तु विशारद ह्यांचा समावेश आहे. आज ही संस्था ६ शाखा , ८ वसतिगृहे, , १७ मार्गदर्शक समित्या ,११०० कार्यरत माजी विद्यार्थी हयाद्वारे ३५ जिल्ह्यातील ८५० विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास व्हावा ह्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.

अनेक सामाजिक संस्थांची माहिती घेऊन, तसेच तिथे प्रत्यक्ष भेट देऊन ह्या पुरस्काराची निवड केली जाते. केशवसृष्टी पुरस्कारासाठी निवड ज्या समिति तर्फे केली जाते त्यामध्ये डॉ. अलका मांडके, डॉ. शुभा राऊळ, डॉ. कविता रेगे, श्रीमती हेमा भाटवडेकर, श्रीमती रश्मी भातखळकर, श्रीमती वैजयंती कुलकर्णी-आपटे, श्रीमती अर्चना वाडे, सुनयना नटे, अॅड. सुनीता तिवारी, श्रीमती राधा पेठे, श्रीमती शुभदा दांडेकर, श्रीमती सीमा उपाध्याय ह्यांचा समावेश आहे. या वर्षीच्या अध्यक्षा श्रीमती अमेया जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या वर्षीच्या केशवसृष्टी पुरस्काराची निवड करण्यात आली. येत्या ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ठाणे येथे श्रीराम व्यायामशाळा संस्था, डॉक्टर मूस रोड, तलावपाळी जवळ, येथे संपन्न होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा