28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषभाजपला मतदान न करण्याची धमकी

भाजपला मतदान न करण्याची धमकी

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमधील आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे आमदार हमीदुल रहमान यांनी गुरुवारी नागरिकांना भाजपला मतदान न करण्याची धमकी दिल्याची घटना घडली. उत्तर दिनाजपुर जिल्ह्यातील माझीयाली गावात एका सभेवेळी हा प्रकार घडला. केंद्रीय निमलष्करी दल २६ तारखेपर्यंत असेल त्यानंतर आम्हीच आहोत, असे ते म्हणाले.

आमदार रहमान म्हणाले, तुमच्या नशिबात येणाऱ्या दुखद घटनेची तक्रार तेव्हा करू नका. रहमान यांनी मतदारांना २०२१ च्या विधानसभा निवडणुका आणि २०२३ च्या पंचायत निवडणुकांमध्ये टीएमसीच्या हिंसाचाराची आठवण करून दिली.
यापूर्वी मार्च २०२१ मध्ये त्यांनी भाजपच्या समर्थकांना ‘नमाखाराम’ म्हणून संबोधले आणि निवडणुकीनंतर त्यांच्यावर कठोरपणे कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. २४ मार्च रोजी पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कनिंग उपविभागातील मात्र दिघी गावात तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडाच्या जमावाने अनेक भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात भाजपचे चार कार्यकर्ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हिंसक चकमकीमध्ये टीएमसीचे तीन कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्या सर्वांवर आता कॅनिंग उपविभागीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा..

‘जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळेल, लवकरच विधानसभा निवडणूक होणार’!

रत्‍नागिरी:कुणबी समाजाचे नेते प्रकाश मांडवकर भाजपच्या वाटेवर!

सावंतवाडीतील गंजिफा कलेला आणि लाकडी खेळण्यांना जीआय मानांकन

बेंगळुरू रामेश्वर कॅफे स्फोटातला मास्टरमाइंड कोलकात्यात सापडला!

टीएमसीच्या गुंडांनी कॅनिंग पूर्वा मंडळ क्रमांक ३ चे मंडळ अध्यक्ष आणि इतर अनेक कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्ते बिवास मोंडल आणि सुब्रत दास यांची प्रकृती चिंताजनक आहे.सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसचे आमदार सओकत मोल्ला यांचा जवळचा सहकारी असलेल्या हुसेन शेखवर आरोप केला आहे. शेख यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी आयोगाला केली आहे.२३ मार्च रोजी सकाळी भाजप कार्यकर्त्याचे हात बांधलेले मृतदेह त्यांच्या राहत्या घराजवळील भातशेतीत आढळून आले. पश्चिम बंगालमधील पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील खरगपूर उपविभागातील पिंगला गावात ही घटना घडली. शंतनू घोराई असे मृताचे नाव आहे. त्याच्या वडिलांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षावर या हत्येचे खापर फोडले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा