28.9 C
Mumbai
Wednesday, July 15, 2026
घरविशेषशेवपुरीसाठी बस २० मिनिटे रस्त्यातच

शेवपुरीसाठी बस २० मिनिटे रस्त्यातच

मुलुंडमध्ये बेस्ट चालकामुळे वाहतूक ठप्प

Google News Follow

Related

मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ शेवपुरीचे पार्सल घेण्यासाठी बेस्ट बस तब्बल २० मिनिटे रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतूक कोंडी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे एम. जी. रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली असून, संबंधित चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

माहितीनुसार, बुधवारी मुलुंडमधील गजबजलेल्या एम. जी. रोडवर ही घटना घडली. रेल्वे स्थानक आणि व्यावसायिक परिसराला जोडणाऱ्या या रस्त्यावर त्या वेळी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. चालकाने शेवपुरीचे पार्सल मिळेपर्यंत बस पुढे हलवण्यास नकार दिल्याने मागे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि गर्दीच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी झाली.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, नागरिकांनी चालकाला याबाबत जाब विचारला असता त्याने उलट आक्रमक भूमिका घेत शिवीगाळ केली. “शेवपुरीसारख्या किरकोळ कारणासाठी सार्वजनिक वाहतूक रोखली जाऊ शकते, यावर विश्वास बसत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक रहिवाशाने व्यक्त केली.

या घटनेचा व्हिडीओ आणि माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी बेस्ट प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सार्वजनिक सेवा देणाऱ्या वाहनांचा अशा पद्धतीने वापर होणे गंभीर असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

भाजप पदाधिकारी तथा बेस्ट समिती सदस्य अजय सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ बेस्ट अधिकाऱ्यांकडे तक्रार पाठवली आहे. “तक्रारीची नोंद घेण्यात आली असून संबंधित चालकाविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कामावरून घरी परतणाऱ्या एका नागरिकानेही सोशल मीडियावर अनुभव मांडत, बस बराच वेळ रस्त्यात उभी असल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे सांगितले. “वाहक खाऊचे पार्सल घेऊन आल्यानंतरच बस पुढे निघाली. चालकाला विचारणा केली असता त्याने शिवीगाळ केली,” असा आरोपही त्यांनी केला.

हे ही वाचा:

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली

“काश्मीरमध्ये आमचेच दहशतवादी लढले आणि…”, हिजबुल कमांडरच्या कबुलीने पाकची नाचक्की

एकेकाळी ‘नकोशी’ असणारी वाघीण बनली गिरडच्या जंगलाची ‘राणी’

भारतीय नौदलाला नवे बळ! अत्याधुनिक ‘आयएनएस महेंद्रगिरी’ ताफ्यात

या प्रकारामुळे बेस्टच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित चालकावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा