बांगलादेश: हिंदूंच्या घराची तोडफोड, अतिथंडीमुळे महिलेचा मृत्यू!

पिडीत कुटुंबाकडून कारवाईची मागणी 

बांगलादेश: हिंदूंच्या घराची तोडफोड, अतिथंडीमुळे महिलेचा मृत्यू!

बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंदूंना लक्ष करण्याचे काम कट्टरपंथी करत आहेत. मारहाण, चोरी, अत्याचार, अपहरण, मंदिर-मूर्तींची तोडफोड केली जात आहे. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, दररोज अशा घटना घडत आहेत. अशा घटनांमुळे बांगलादेशातील हिंदू समाज भयभीत झाला असून संरक्षण आणि कट्टरवाद्यांवर कारवाईची मागणी युनुस सरकारकडे करत आहे. अशातच आणखी एक घटना बांगलादेशातून समोर आली आहे. घराच्या तोडफोडीमुळे ताडपत्री मारून राहिलेल्या हिंदू कुटुंबातील एका ७० वर्षीय महिलेचा अतिथंडीमुळे मृत्यू झाला आहे.

बांगलादेशच्या टांगैल येथील कुतुबपूर येथे ही घटना घडली. २३ फेब्रुवारी रोजी इस्लामी कट्टरवाद्यांनी एका हिंदू कुटुंबाच्या घराची तोडफोड केली. घटनेनंतर स्थानिक पोलीस तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कारवाई अथवा कुटुंबाला सहकार्य मिळाले नाही. अखेर कुटुंबाने ताडपत्री बांधून दिवस काढण्याचा निर्णय घेतला आणि आजही ते कुटुंब ताडपत्री राहत आहे.

याच दरम्यान, वाढलेल्या थंडीमुळे कुटुंबातील एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना समोर आल्यानंतर हिंदू समाजाकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हिंदूवरील वाढत्या अत्याचारावर युनुस सरकार अजूनही मुग गिळून गप्प आहे. याउलट आमच्या देशात सर्व जातीचे लोक सुरक्षित असल्याचे युनुस यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

महाकुंभाची समाप्ती, मुख्यमंत्री प्रयागराजमध्ये दाखल, गंगा पूजेत सहभागी!

अॅड. साळवी यांच्या ‘कॉमेंट्री ऑन पॉक्सो’ पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात

पुणे बलात्कार प्रकरण: आरोपीवर एक लाखांचे बक्षीस जाहीर!

डॉ. सुनील देवधर यांच्या उपस्थितीत रिडीफायनिंग एम्प्लॉयमेंट २०२५ चे आयोजन

दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हिंसाचार आणि भेदभावाचे चित्रण करणाऱ्या प्रदर्शनाला भेट दिली. अजित डोवाल यांनी ‘बांगलादेशातील अल्पसंख्याकांचा कधीही न संपणारा छळ’ या विषयावरील पॅनेल चर्चेतही भाग घेतला. हे दोन्ही कार्यक्रम विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनने आयोजित केले होते.

Exit mobile version