29 C
Mumbai
Friday, August 28, 2026
घरविशेषकानपूरमध्ये प्रशिक्षण विमान कोसळलं; सहपायलटसह पायलटचा मृत्यू

कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान कोसळलं; सहपायलटसह पायलटचा मृत्यू

अपघाताचे कारण अस्पष्ट

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये प्रशिक्षण विमानाचा भीषण अपघात झाला. गंगा नदीच्या काठावरील गंगा बॅरेज परिसरातील शेतात खासगी प्रशिक्षण विमान कोसळल्याने पायलट आणि सहपायलटचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली.

हे विमान कानपूरस्थित गार्ग एव्हिएशन या विमान प्रशिक्षण संस्थेचं होतं. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही पायलट्सना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत पायलटला ३ हजारांहून अधिक तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता. तो गुजरातचा रहिवासी होता, तर सहपायलट कर्नाटकचा असल्याचं सांगण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला असून, नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) ला माहिती देण्यात आली आहे. DGCAचं पथक घटनास्थळी दाखल होऊन अपघाताची कारणं तपासणार आहे. याशिवाय, Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) कडूनही चौकशी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

हिमनदीचा नैसर्गिक बांध तुटला अन् नेपाळमध्ये महाप्रलय!

नेपाळच्या महापुरात जवळपास ३०० भारतीय पर्यटक बेपत्ता

ईदच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळमध्ये राडा; दोन गटांत हाणामारी

सीमावाद सोडवण्यासाठी भारत- चीनची आठ मुद्द्यांवर सहमती

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. अपघाताचं कारण तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
329,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा