29.2 C
Mumbai
Sunday, May 3, 2026
घरविशेष'ट्रम्पचा टॅरिफ': उद्योगावर तात्पुरता ताण, सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू!

‘ट्रम्पचा टॅरिफ’: उद्योगावर तात्पुरता ताण, सरकारकडून दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू!

वाणिज्य मंत्रालय

Google News Follow

Related

अमेरिकेने लावलेले ५०% पर्यंतचे टॅरिफ (आयात कर) भारत-अमेरिका व्यापारावर परिणाम करणार, हे स्पष्ट असून याचा तात्पुरता फटका कापड, रसायन आणि यंत्रसामग्री क्षेत्रांना बसणार आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

“५०% टॅरिफ्स व्यापारावर परिणाम करणार, हे समजून घेण्यासारखं आहे. कापड, रसायने आणि यंत्रसामग्री क्षेत्रांवर याचा तात्पुरता परिणाम होईल, मात्र दीर्घकालीन तोटा होण्याची शक्यता कमी आहे,” असं त्यांनी सांगितलं. उद्योग क्षेत्र चिंतेत असून त्यांनी सरकारकडे सातत्याने निवेदने पाठवली आहेत.

“त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की तात्पुरत्या काळात त्यांचे ऑर्डर्स कमी होतील, तरलता (liquidity) कमी होईल आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना अडचणी येतील. या तातडीच्या तरलतेच्या तुटवड्याशी सामना करण्यासाठी त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे,” असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

सरकार या उद्योगांच्या सुचनांवर काम करत असून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. “त्यांच्या सुचनांचा विचार सरकारच्या अजेंड्यावर आहे. आम्ही ‘एक्सपोर्ट प्रमोशन मिशन’ (EPM) लवकरात लवकर राबवण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे उद्योगाला काही प्रमाणात चालना व आधार मिळेल,” असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हे ही वाचा : 

“गुजरातला पुरस्कार राजीव गांधी फाउंडेशनने दिला, राहुल गांधींनी आईला विचारावं”

“राहुल गांधींच्या बिहार रॅलीत पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईविरुद्ध आक्षेपार्ह भाषा!

“मोदी-ट्रम्प यांची चर्चा राहुल गांधींच्या समोर झाली होती का?”

राहुल गांधी यांच्या यात्रेत भाषा घसरतेय

ते पुढे म्हणाले, “आपल्याला अधिक मजबूत आणि लवचिक पुरवठा साखळ्या (supply chains) उभाराव्या लागतील – मग त्या निर्यातविषयक असोत किंवा आयातविषयक. प्रत्येक आव्हान ही एक संधी असते. त्यामुळे ही परिस्थिती उद्योग, सरकार आणि सर्वांसाठीच एक ‘wake-up call’ ( सावध करणारा इशारा) आहे – आपण निर्यात कशी अधिक व्यापक आणि विविध क्षेत्रांमध्ये करू शकतो, याचा विचार करण्याची वेळ आहे.”

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा