तेलंगणामध्ये बोगद्याचा भाग कोसळून अपघात; सहा मजूर अडकले

बचाव कार्य सुरू

तेलंगणामध्ये बोगद्याचा भाग कोसळून अपघात; सहा मजूर अडकले

तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यात शनिवारी एका बोगद्याचा काही भाग कोसळून मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. कोसळलेल्या बोगद्याच्या खाली सहा कामगार अडकून पडले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले असून बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

श्रीशैलम डाव्या तिरावरील कालव्याच्या निर्माण कार्याच्या भागात शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. कालव्याच्या १४ किमी अंतरावरील गळती बंद करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काँक्रीटच्या भागाच्या घसरणीमुळे हा अपघात झाला. मुख्यमंत्री कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. रेवंत रेड्डी यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि अग्निशमन विभाग आणि हैदराबाद आपत्ती प्रतिसाद आणि मालमत्ता संरक्षण संस्थेतील (HYDRAA) कर्मचाऱ्यांना तात्काळ मदत उपाययोजना हाती घेण्याचे आदेश दिले आहेत.”

हे ही वाचा..

… आणि ऑस्ट्रेलिया- इंग्लंड मॅचआधी लाहोरच्या मैदानात वाजलं भारताचे राष्ट्रगीत!

बांगलादेशींनी वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरेंना निवडून आणलं

उत्तर प्रदेशातील ९०,००० कैद्यांनी केले पवित्र स्नान!

सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर अनधिकृत थडग्यावर पालिकेची कारवाई

अपघातावेळी बोगद्यात किती कामगार होते याची अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी, पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार किमान सहा ते आठ लोक बोगद्यात अडकले आहेत. कामगार कामासाठी बोगद्याच्या आत गेले असताना वरचा भाग कोसळला. राज्याचे पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रेड्डी, पाटबंधारे सल्लागार आदित्य नाथ दास, आयजी सत्यनारायण आणि डीजी अग्निशमन सेवा जीव्ही नारायण राव घटनास्थळी मदत कार्याचे निरीक्षण करत आहेत.

Exit mobile version