कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये भारतीय हवाई दलाच्या (IAF) विंग कमांडरवरील हल्ल्याच्या प्रकरणात एक नवीन वळण आले आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर आदित्य बोस यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी विंग कमांडर स्वतःवर हल्ला झाल्याचे म्हटले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये, विंग कमांडर दुचाकीस्वारावर शारीरिक हल्ला करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, अधिकाऱ्याने शारीरिक हल्ला सुरू केल्याचे दिसून येत आहे, तर त्याची पत्नी देखील शाब्दिक शिवीगाळ करताना दिसत आहे. एका फुटेजमध्ये विंग कमांडर बोस त्या माणसाला रस्त्यावर ढकलत असल्याचे आणि वारंवार लाथा मारत असल्याचे दिसून आले. यावेळी विंग कमांडर बोसला अनेकजण थांबवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत.
सोमवारी (२२ एप्रिल) सकाळी टिन फॅक्टरी जंक्शनजवळ विंग कमांडर बोस आणि त्यांची पत्नी विमानतळावर जात असताना ही मारहाणीची घटना घडली होती. विंग कमांडर बोस सध्या कोलकाता येथे आहेत. बेंगळुरू पोलिसांच्या सुरू असलेल्या तपासाचा भाग म्हणून त्याला लवकरच चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. जखमी दुचाकीस्वार विकास कुमार, जो कॉल सेंटरमध्ये कर्मचारी आहे. त्याच्या तक्रारीवरून, बैयप्पनहल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
हे ही वाचा :
सपा-काँग्रेस ‘महिला-विरोधी मानसिकतेचे’
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी पाहिला जयपूरचा आमेर किल्ला
नव्या पोप निवडीच्या कॉन्क्लेव्हमध्ये ‘हे’ चार भारतीय कार्डिनल्स सहभागी होणार; कशी असते प्रक्रिया?
मुंबईत महिलेची गळा चिरून हत्या
दरम्यान, विंग कमांडर बोस याने काल (२१ एप्रिल) त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता आणि संपूर्ण घटनेचे तपशीलवार वर्णन केले होते. व्हिडीओमध्ये त्याच्या चेहऱ्यावर आणि मानेवर जखमेच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. विंग कमांडर बोसच्या माहितीनुसार, एका दुचाकीस्वाराने त्याच्या गाडीचा पाठलाग सुरू केला आणि कार थांबवून कन्नड भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
या प्रकरणी विंग कमांडरच्या पत्नीने बैयप्पनहल्ली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र, आता समोर आलेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये विंग कमांडर त्या दुचाकीस्वाराला मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.







