23 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरविशेषअटल सेतुवर एका आठवड्यात दोन आत्महत्या, दोन्ही मृतदेह सापडले!

अटल सेतुवर एका आठवड्यात दोन आत्महत्या, दोन्ही मृतदेह सापडले!

आतापर्यंत पुलावरून सहा जणांनी आत्महत्या

Google News Follow

Related

शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरून माटुंग्यातील एका व्यवसायिकाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली आहे. या आठवड्यातील ही दुसरी घटना असून सोमवारी परळमध्ये राहणाऱ्या बँक अधिकाऱ्याने अटल सेतू वरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. अटल सेतू सुरू झाल्या पासून ही सहावी आत्महत्या असून एका महिलेला आत्महत्या करताना वाचविण्यात देखील आले होते. बुधवारी घडलेल्या आत्महत्येच्या घटनेप्रकरणी न्हावा शेवा पोलिसांनी मृत्यूची नोंद केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिलीप हितेश शाह असे मृताचे नाव असून तो माटुंगा येथे कुटुंबासह राहत होता. त्यांनी सांगितले की, फिलिप शाह गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होता आणि त्यामुळेच त्याने आपले जीवन संपवले असा कुटुंबीयांचा संशय आहे.फिलीप शाह या व्यावसायिकाने बुधवारी सकाळी अटल सेतूवरून उडी मारून आपले जीवन संपवले . मध्य मुंबईतील माटुंगा येथील रहिवासी असलेल्या शहा यांनी आपली सेडान कार अटल सेतूवर आणली , ती एका ठिकाणी उभी करून समुद्रात उडी टाकली, पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पुलाच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांना पुलावर एक कार उभी असल्याचे लक्षात आले, त्यानंतर बचाव पथकाला सतर्क करण्यात आले.

हे ही वाचा : 

उबाठाचे गाणे ‘उतलो माय, मातलो गं माय’ असं हवं होतं !

कोलकाता बलात्कार हत्या प्रकरण : पीडितेचा पुतळा बसवण्यावरून वाद

अनाथ मुलींना पुरस्कार न देताच झाकीर नाईक निघून गेला!

नसरल्लाच्या मुलीनंतर इस्रायलने जावयालाही उडवले!

फिलिप शाहने ज्या ठिकाणी समुद्रात उडी मारली त्या ठिकाणी तेथील कर्मचारी धावले.शोध मोहिमेनंतर, त्यांना मृतदेह मिळून आला आहे.फिलिप शाह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. कारमध्ये सापडलेल्या त्याच्या आधार कार्डाच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटली, ते म्हणाले की, मृत्यूपूर्वी गेल्या काही दिवसांपासून पीडित व्यक्ती मानसिक तणावाखाली होती. याप्रकरणी नवी मुंबईतील न्हावा शेवा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमवारी सकाळी एका राष्ट्रीयीकृत बँकेत डेप्युटी मॅनेजर असलेल्या सुशांत चक्रवर्ती यांनी आपली कार शिवडी येथील पुलावर उभी करून समुद्रात उडी मारली. चक्रवर्तीच्या पत्नीने सांगितले की, तो दक्षिण मुंबईतील बँकेच्या फोर्ट शाखेत काम करतो आणि त्याच्यावर कामाचा ताण होता.शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आणि शिवडी पोलिसांनी वाहनाच्या नंबरप्लेटच्या आधारे कुटुंबाचा शोध घेतला, असे शिवडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक रोहित खोत यांनी सांगितले. अटल सेतू सुरू होऊन वर्ष उलटले नसताना आता पर्यत या पुलावरून सहा जणांनी आत्महत्या केली तर दोन जणांना पोलिसांनी आत्महत्या करण्यापासून वाचवले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा