26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषघाटकोपर उड्डाणपुलाचे नियम गेले उडत; दुचाकीस्वारांचा मुजोरपणा

घाटकोपर उड्डाणपुलाचे नियम गेले उडत; दुचाकीस्वारांचा मुजोरपणा

Google News Follow

Related

घाटकोपर मानखुर्द जोडरस्त्यावर दुचाकीस्वारांना मनाई करण्यात आली होती, पण या दुचाकीस्वारांचा मुजोरपणा वाढीस लागला असून त्यांनी सगळे नियम मोडत या रस्त्यावरून वाहतूक करायला सुरुवात केली आहे.

वाहतूक कोंडी रोखण्यासाठी करण्यात आलेला घाटकोपर- मानखुर्द जोडरस्ता हा महिन्याभरात बंद करावा लागला. उड्डाणपुलावरील निकृष्ट बांधकामामुळे पूल एक महिन्याच्या आता बंद करावा लागल्यामुळे पालिकेची चांगलीच नाचक्की झाली होती. या पुलामुळे अपघातही मोठ्या प्रमाणावर होत होते. खासकरून दुचाकीस्वार या पुलाचा वापर करत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पालिकेने हा पूल दुचाकीस्वारांसाठी बंद केला. परंतु दुचाकीस्वार मात्र सर्व नियमांना धुडकावत या पुलावरुन प्रवास करत आहेत.

सप्टेंबरमध्ये हा उड्डाणपुल एक महिन्याकरता बंद करण्यात आला होता. त्यावेळी एकही अपघात झाला नव्हता. सध्याच्या घडीला उड्डाणपुलावर अतिरिक्त रम्बलर्स आणि स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे वेगाला आळा घालण्यात आलेला आहे. काम झाल्यानंतर १ ऑक्टोबरपासून हा उड्डाणपूल पुन्हा सुरु झाला.

घाटकोपर मानखुर्द पूल हा मूळातच तीन वर्षांच्या विलंबानंतर तयार झाला होता. मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केल्यानंतर अवघ्या ४८ तासांच्या आत एक अपघात झाला होता. त्यानंतर या पूलावर अनेक अपघात आणि गाड्या घसरण्याचे प्रमाण वाढले. ३० ऑगस्टला उड्डाणपुलावर दुचाकी घसरल्याने ३४ वर्षीय शिवाजी नगरमधील एक रहिवासी ठार झाला होता. त्यामुळे वाढत्या अपघातांच्या घटनेमुळे महानगरपालिकेने (बीएमसी) उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गावर काम सुरु केले.

हे ही वाचा:

‘घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबार जेलमध्येही जाईन!

उद्धव ठाकरे म्हणजे लायसन्स नसलेले ड्रायव्हर, शिवसेनेचाच नेता असे का म्हणाला?

कुंडुझमध्ये शिया मुसलमानांवर पुन्हा हल्ला

अरेरे! दसऱ्याच्या पुजेसाठी फुले आणायला गेलेले उपसरपंच अपघातात मृत्युमुखी

 

या कामांतर्गत रोड मिलिंग आणि अधिक रम्बलर्स, सीसीटीव्ही कॅमेरे आणि वेग मर्यादेचे संकेत असे सर्व करण्यात आले. तसेच त्यानंतर हा उड्डाणपूल एक आठवडा बंदही ठेवण्यात आला होता. दुचाकी वाहतुकीसाठी १ ऑक्टोबरपर्यंत बंदीसह पुन्हा खुला करण्यात आला आहे. परंतु त्यानंतरही दुचाकीस्वार मात्र नियम धुडकावून या उड्डाणपुलाचा वापर करत आहेत. त्यामुळेच आता सध्याच्या घडीला वाहतूक विभाग आता जेजे फ्लायओव्हर आणि ईस्टर्न फ्रीवेप्रमाणेच दुचाकी बंदी चालू ठेवण्याचा विचार या पुलावरही करणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा