33 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषएजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ शो अखेर उल्लू ॲपने घेतला मागे!

एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ शो अखेर उल्लू ॲपने घेतला मागे!

राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस बजावत हजर राहण्याचे निर्देश 

Google News Follow

Related

अभिनेता आणि बिग बॉसचा माजी स्पर्धक एजाज खान याने होस्ट केलेला ‘हाऊस अरेस्ट’ शो अखेर बंद करण्यात आला आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शो वर अश्लीलता पसरवल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या शोच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती आणि प्रेक्षकांनी यावर टीका करत कारवाई करण्याची मागणी केली होती. जनतेत उसळलेल्या प्रक्षोभानंतर अखेर उल्लू ॲपने ‘हाऊस अरेस्ट’ शो मागे घेतला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) देखील याची दखल घेत उल्लूचे सीईओ विभू अग्रवाल आणि अजाज खान यांना नोटीस बजावली आहे. त्यांना ९ मे २०२५ रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स बजावले आहेत. २९ एप्रिल रोजीच्या शोमधील एका व्हायरल क्लिपनंतर ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये कथितरित्या होस्ट महिला सहभागींना कॅमेऱ्यासमोर लैंगिक सूचक कृत्ये करण्यास भाग पाडत असल्याचे दाखवण्यात आले होते.

राजकीय व्यक्तींनी देखील हा मुद्दा उचलून धरला होता. राज्यातील भाजपाच्या महिला आमदार चित्रा वाघ यांनी याबाबत काल एक्सवर ट्वीटकरत या शोवर कारवाई करण्याची मागणी माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती.

हे ही वाचा  : 

“आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल…” केरळमधील कार्यक्रमात नरेंद्र मोदी असे का म्हणाले?

“पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध…” पाकच्या संरक्षण मंत्र्यांनंतर माजी परराष्ट्र मंत्र्यांकडूनही कबुली

“आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल…” केरळमधील कार्यक्रमात नरेंद्र मोदी असे का म्हणाले?

पाकिस्तानच्या खोटारडेपणाची हद्द, म्हणे भारताच्या एअर मार्शलना नोकरीवरून काढले!

“स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा ‘हाऊस अरेस्ट’ नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे कंटेंट सहज पोहोचत आहेत. असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही, तर समाजाच्या आरोग्याची विटंबना आहे. असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत घाला आहे. उल्लू ॲपसह असे कंटेंट तयार करणाऱ्या सर्व ॲप्सवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली होती.

या संपूर्ण वादादरम्यान अखेर शो बंद करण्याचा निर्णय घेतला. प्लॅटफॉर्मने त्यांच्या वेबसाइट आणि ॲपवरून हाऊस अरेस्टचे सर्व भाग काढून टाकले आहेत. तसेच होस्ट एजाज खानविरुद्धही एफआयआर दाखल करण्यात आल्याचे माहिती समोर आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा