28 C
Mumbai
Thursday, February 26, 2026
घरविशेषराज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण

राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण

Google News Follow

Related

यंदा पासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह मंत्री गणांच्या उपस्थितीत करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्य, स्पर्धा, रोषणाईसह; व्याख्याने, लोककलांच्या अविष्काराच्या भरगच्च कार्यक्रमांसाठी सुमारे ११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या वर्षी थेट शासनाच्या सहभागातून गणेशोत्सव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी सांगितले.

महाराष्ट्र ही कला, संस्कृती व परंपरेची समृद्ध भूमी आहे. संत-सुधारकांचा, थोरांचा-विरांचा, भक्तीचा-अध्यात्माचा आणि सर्वसमावेशकतेचा वारसा या भूमीला लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली दख्खनची ही पवित्र माती, वैचारिक प्रकल्गभतेने ओतप्रेत भरलेली असून; राज्याच्या आर्थिक/सामाजिक/ सांस्कृतिक प्रगतीचा पाया इथल्या सामाजिक एकरुपतेने घातलेला आहे. ही एकरूपता निर्माण होण्यासाठी “सार्वजनिक गणेशोत्सव” मोलाची भूमिका बजावत आहे. शेकडो वर्षाची घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक समरसतेचे मानबिंदू!

हेही वाचा..

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक

बी. सुदर्शन रेड्डी इंडी आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार

अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे – गिरीश महाजन

जीडीपी वाढ २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ६.७ टक्के राहण्याचा अंदाज

याच मानबिंदूचे महत्त्व व ओळख संपूर्ण जगभर व्हावी, आपल्या परंपरेची आधुनिकतेशी सांगड घातली जावी, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे गणेशोत्सव हे व्यासपीठ आणखी मजबूत व्हावे, गणेशोत्सवासंबंधी सर्व घटक एकत्र जोडले जावेत, पर्यटन वाढावे, आपल्या समृद्ध परंपरा रितीरिवाजांचे जतन-संवर्धन व्हावे आणि महाराष्ट्राचे स्थान जगाच्या नकाशावर अधोरेखित व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाचा प्रत्यक्ष सहभाग त्यात असावा म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. या संदर्भात चार वेगवेगळे शासन निर्णयही निर्गमित झालेले आहेत.

भारतीय सैन्य दलाने फत्ते केलेले “ऑपरेशन सिंदूर” आणि स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर भारत निर्माणासाठी “स्वदेशीचा जागर” हे दोन विषयही या निमित्ताने राज्यमहोत्सवाशी जोडण्यात येत आहेत. अध्यात्म, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक असणारा सार्वजनिक गणेशोत्सव यावर्षीपासून राज्यमहोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असून, यानिमित्त एका बोधचिन्हाचे अनावरण आज मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या करण्यात आले. हे बोधचिन्ह उत्सवात सर्वत्र वापरले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा