22 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरविशेष‘मेयो' व 'मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे

‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरण गुणवत्तापूर्ण करावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Google News Follow

Related

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) याबाब विश्वासार्हता अधिक असून. येथील वैद्यकीय सेवा-सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. ही कामे आराखड्यानुसार कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, आशीष देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. राज गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा..

बहुप्रतीक्षित झेड-मोर बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार !

निवडणुकीसाठी आपच्या मुख्यमंत्र्यांनी हात पसरले !

प्रशांत कुमार सिंग मणिपूरचे नवे मुख्य सचिव

ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एस जयशंकर उपस्थित राहणार

मेयो आणि मेडिकलची प्रगतीपथावरील कामे, सद्यस्थिती, अडी-अडचणी, कामाची गुणवत्ता यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच येथील वीजेची गरज सौर ऊर्जेच्या माध्यमातून भागविली पाहिजे. संपूर्ण कॅम्पस सौर ऊर्जेवर असावा. सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण केल्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत. यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. अधिकाधिक झाडे लावण्यावर भर देण्यात यावा. उभारण्यात येणाऱ्या सर्व इमारतीमधील प्रसाधनगृहांची देखभाल योग्य प्रकारे व्हावी यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याच्या सूचना ही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केल्या. मेयो आणि मेडिकल येथे सुरू असलेल्या कामांचा एप्रिल महिन्यात पुन्हा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी कामाच्या सद्यस्थितीची माहिती प्राधान्याने घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा