आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण महाकुंभात सहभागी, संगमात केले स्नान!

आतापर्यंत ५४.३१ कोटींहून अधिक भाविकांचे संगमात स्नान

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण महाकुंभात सहभागी, संगमात केले स्नान!

१३ जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये सुरु झालेला महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीच्या स्नानानंतर संपणार आहे. आज महाकुंभाचा ३७ वा दिवस आहे. दररोजप्रमाणे आजही संगममध्ये स्नान करण्यासाठी घाटांवर गर्दी जमत आहे. महाकुंभाच्या सुरुवातीपासून, ५४.३१ कोटींहून अधिक लोकांनी संगमात स्नान केले आहे. १४४ वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभमेळ्याला राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांसह अन्य मंत्री, विरोधी नेत्यांनी सहभाग नोंदवला.

याच पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि दक्षिण स्टार पवन कल्याण यांनी आज (१८ फेब्रुवारी ) महाकुंभ मेळ्यात सहभागी होत त्रिवेणी संगमात स्नान केले आणि प्रार्थना केली. एएनआयशी बोलताना उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले, ‘महाकुंभाला येणे ही आपल्या सर्वांसाठी एक उत्तम संधी आहे. आपली भाषा वेगळी असू शकते, आपली संस्कृती वेगळी असू शकते, आपल्या चालीरीती वेगळ्या असू शकतात, पण आपल्या सर्वांचा धर्म एकच आहे.

ते पुढे म्हणाले, महाकुंभमेळ्याचे आयोजन केल्याबद्दल मी योगी सरकारचे आभार मानतो. मी अनेक वर्षांपासून प्रयागराजला येण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज मला महाकुंभाला येण्याचे सौभाग्य मिळाले.

हे ही वाचा : 

सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला डॅमेज केले

संभाजी महाराजांवरील अत्याचार पाहून प्रेक्षक संतापला, मल्टिप्लेक्सची स्क्रीन टराटरा फाडली!

महाकुंभला ‘मृत्यू कुंभ’ म्हणत ममता बॅनर्जी बरळल्या

तेलंगणा सरकारचे मुस्लिम लांगुलचालन, रमजानसाठी कर्मचाऱ्यांना कामातून सूट!

राज्यसभा खासदार आणि भाजप ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के.लक्ष्मण हे देखील महाकुंभात पोहोचले.  स्नानानंतर त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री योगी यांच्या नेतृत्वाखाली महाकुंभात चांगल्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. दक्षिण भारतातूनही लाखो लोक येथे येत आहेत. परंतु, विरोधी पक्ष यावरही राजकारण करत आहे हे खूप दुःखद आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही संगमात स्नान केले. ते म्हणाले, भारतातील सनातन धर्मावर श्रद्धा असलेल्यांसाठी महाकुंभ हा एक अलौकिक अनुभव आहे. महाकुंभाला करोडो लोक येत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेली व्यवस्था खूपच चांगली आहे. सर्वजण शिस्तबद्ध पद्धतीने मेळ्यात सामील होत आहेत.

Exit mobile version