छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा’ चित्रपटाची देशभरात चर्चा आहे. चित्रपटाने आतापर्यंत १४५ कोटींची कमाई केली असून घोडदौड सुरूच आहे. अभिनेता विकी कौशलने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. छत्रपती संभाजी महाराजांवर झालेला अत्याचार, महाराजांनी सोसलेल्या यातना अभिनेत्याने हुबेहुबे सादर करण्याचा प्रयत्न केला.
चित्रपटातील अनेक अशी दृश्ये आहेत जी मने हेलावून टाकणारी आहेत. ही दृश्ये पाहून प्रेक्षकांनी डोळ्यात पाणी आणले. अनेकजण चित्रपटगृहात, चित्रपटगृहाबाहेर येवून ढसाढसा रडले. याच दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांवरील मुघलांचे अत्याचार पाहून एका प्रेक्षकाने सिनेमाचा पडदा टराटरा फाडल्याचे समोर आले आहे. या घटनेचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये संतप्त झालेला प्रेक्षक सिनेमाचा पडदा फाडताना दिसत आहे.
गुजरातच्या भरूच मध्ये रविवारी (१६ फेब्रुवारी) ही घटना घडली. जयेश वसावा असे सिनेमाचा पडदा फाडणाऱ्याचे नाव आहे. भरूच ए डिव्हिजन पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी रात्री आरके सिनेमामध्ये चित्रपटाच्या शेवटच्या शो दरम्यान ही घटना घडली, जो रात्री ११.४५ वाजता होता.
हे ही वाचा :
महाकुंभला ‘मृत्यू कुंभ’ म्हणत ममता बॅनर्जी बरळल्या
हा गळणाऱ्या पाण्याचा नाही, फुटलेल्या मडक्याचा दोष !
तेलंगणा सरकारचे मुस्लिम लांगुलचालन, रमजानसाठी कर्मचाऱ्यांना कामातून सूट!
सिसोदियांनी शासकीय वस्तू चोरल्या
अधिकारी पुढे म्हणाला, छत्रपती संभाजी महाराजांवरील अत्याचार पाहून तो औरंगजेबावर हल्ला करण्यासाठी पडद्यावर धावला. त्यानंतर त्याने सिनेमाचा पडदा फाडला. दरम्यान, सिनेमाचा पडदा फाडतानाचे व्हिडीओ फुटेजही समोर आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, जयेश वसावा याला अटक करण्यात आली आणि तो दारूच्या नशेत होता.
आरके सिनेमाचे जनरल मॅनेजर आरव्ही सूद म्हणाले, कर्मचाऱ्यांकडून मला फोन आला की एका प्रेक्षकाने स्क्रीन खराब केली आहे, फाडून टाकली आहे. मी त्याला सभागृहातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले जेणेकरून जेणेकरून आणखी काही नुकसान होवू नये. पोलिसांना याबाबत माहिती देत त्याला त्यांच्या हवाली केले. या घटनेत सुमारे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सूद यांनी सांगितले.