26 C
Mumbai
Tuesday, March 18, 2025
घरविशेषसत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला डॅमेज केले

सत्तेसाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना, हिंदुत्वाला डॅमेज केले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

Google News Follow

Related

सत्तेच्या खुर्चीसाठी २०१९ मध्येच त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केले, हिंदुत्वाला डॅमेज केले, शिवसेनेला डॅमेज केले, आता आभाळ फाटलंय त्याला कुठे कुठे ठिगळ लावणार अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर केली. मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीसारखा खुर्चीचा अजेंडा नाही तर महायुतीचा अजेंडा हा सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये बदल घडवणे आणि त्यांना न्याय देणे, राज्याला पुढे नेणे आहे. राज्यातील महत्वाच्या पायाभूत सेवा प्रकल्पांचा आढावा घेणारी एकच वॉर रुम आहे. नवीन व़ॉर रुम झालेली नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांकडील खात्यांचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. हा कक्ष व़ॉर रुमशी संलग्न आहे. त्यामुळे महायुतीत कोल्ड वॉर नाही तर महाराष्ट्र विकास विरोधी लोकांशी वॉर आहे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

हेही वाचा..

संभाजी महाराजांवरील अत्याचार पाहून प्रेक्षक संतापला, मल्टिप्लेक्सची स्क्रीन टराटरा फाडली!

महाकुंभला ‘मृत्यू कुंभ’ म्हणत ममता बॅनर्जी बरळल्या

हा गळणाऱ्या पाण्याचा नाही, फुटलेल्या मडक्याचा दोष !

तेलंगणा सरकारचे मुस्लिम लांगुलचालन, रमजानसाठी कर्मचाऱ्यांना कामातून सूट!

शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २०२३ नुसार उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की या राज्याचा विकास करणे हाच महायुतीचा अजेंडा आहे. महायुतीमध्ये कोणतीही समांतर यंत्रणा नाही. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायत्ता कक्षात वैद्यकीय मदतीचे जे अर्ज येतील, त्यांना मदत केली जाईल. यापूर्वी काहीजण मुख्यमंत्री असताना एकदाच मंत्रालयात आले होते याची आठवण उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी करुन दिली. महाकुंभसाठी शिवसेनेचे नेते प्रयागराजला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

शिवसेना पक्ष हा बाळासाहेबांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे. तुम लढो हम कपडा संभालता है या विचारांचा नाही, असे उपमुख्यमंत्री म्हणाले. आज शिवसेनेत मोठ्या संख्येने लोक येत आहेत त्यांचे आम्ही स्वागत करतोय पण ज्यांना सोडून लोक जात आहेत त्यांनी त्यावर आत्मपरिक्षण करायला हवे, असा सल्ला शिंदे यांनी दिला. बंद पडलेल्या किंवा दिवाळखोरीत गेलेल्या कारखान्यांच्या कामगारांना लवकरात लवकर थकीत देणी मिळावीत, यासाठी राज्याच्या ‘एमआयडीसी’कडून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा