29.5 C
Mumbai
Friday, July 17, 2026
घरविशेषचर्चगेट-विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी

चर्चगेट-विरार लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी

व्हिडिओ व्हायरल, सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Google News Follow

Related

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरी लोकल रेल्वेमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. चर्चगेट-विरार लोकलच्या पुरुषांच्या डब्यात प्रवाशांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, या घटनेमुळे लोकल प्रवासातील वाढत्या असुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्दीच्या वेळी डब्यात झालेल्या किरकोळ वादाचे काही क्षणांतच तीव्र भांडणात रूपांतर झाले. शाब्दिक बाचाबाची सुरू झाल्यानंतर काही प्रवासी एकमेकांवर लाथाबुक्क्यांनी तुटून पडले. खचाखच भरलेल्या डब्यात झालेल्या या प्रकारामुळे इतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवाशांनी मध्यस्थी करत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, तर एका प्रवाशाने संपूर्ण घटना मोबाईलमध्ये चित्रित केली. हाच व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
हे ही वाचा:
युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची चमक फिकी!

“श्रीकृष्ण मुस्लिम होते, दिवसातून पाच वेळा नमाज पढत होते” मौलाना बरळले

वसई-विरारकरांच्या खिशावर पालिकेचा ‘डाका’!

मेसीच्या जादुई पासवर अर्जेंटिनाची कमाल!

या घटनेनंतर मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. मात्र वाढती गर्दी, तणावपूर्ण वातावरण आणि क्षुल्लक कारणांवरून होणारे वाद यामुळे प्रवास अधिक धोकादायक बनत असल्याचे चित्र आहे. अलीकडील काही हिंसक घटनांनंतर आता या हाणामारीनेही सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असला तरी या घटनेबाबत रेल्वे प्रशासन किंवा रेल्वे पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. संबंधित प्रवाशांची ओळख, घटनेची नेमकी वेळ याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या वेळेत रेल्वे पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, लोकलमधील गस्त अधिक प्रभावी करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा