25 C
Mumbai
Monday, July 22, 2024
घरविशेषगायिका अलका याग्निक यांच्या श्रवणशक्तीवर व्हायरल अटॅक, आवाज येणं झालं बंद!

गायिका अलका याग्निक यांच्या श्रवणशक्तीवर व्हायरल अटॅक, आवाज येणं झालं बंद!

सोशल मीडियावर गायिकेने स्वतः दिली माहिती

Google News Follow

Related

आपल्या श्रवणीय गायनाने अनेक रसिकांचे कान तृप्त करणाऱ्या प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याग्निक यांच्या श्रवणशक्तीवर व्हायरल अटॅक झाला आहे. त्यामुळे सध्या त्यांना काहीच ऐकू येत नाहीये. सोशल मीडियावर खुद्द अलका याग्निक यांनी याची माहिती दिली.

अलका याज्ञिक यांना एक दुर्मिळ न्यूरो डिसऑर्डर (आजार) झाला आहे. न्यूरो डिसऑर्डर हा एक दुर्मिळ आजार आहे. ज्यामुळे काहीही ऐकायला येत नाही. एका विमान प्रवासातून बाहेर आल्यानंतर त्यांना काहीच ऐकू येत नसल्याचे गायिकेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. कानात मोठ्याने संगीत ऐकल्याने हा आजार झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मोठ्याने हेडफोन्सवर गाणी ऐकणे टाळा, असे आवाहनही गायिकेने केले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगत उकळले ५० लाख रुपये

राजस्थानमधून रामललासाठी एक अनोखी भेट, पंच धातूपासून बनविलेले धनुष्य, बाण आणि गदा पोहोचली अयोध्येत!

मोबाईलमुळे ईव्हीएम हॅक होते हे सिध्द करून दाखवा

राजू असल्याचे भासवून मोहम्मद शब्बीरचा हिंदू मुलीवर बलात्कार!

दरम्यान, सोशल मीडियावर गायिकेने आपल्या आजाराची माहिती दिल्यांनतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी अलका याग्निक यांच्यासाठी प्रार्थना देखील केली आहे. फक्त चाहत्यांनीच नाहीतर, सेलिब्रिटींनी देखील अलका याज्ञिक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा