नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य समारंभात, १८ वर्षीय प्रतिभावान तरुण लेखक आणि शास्त्रज्ञ विवान कारुळकरांना IIT पटना कडून साहित्यिक उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांना इस्रोचे माजी अध्यक्ष (२०१५-२०१८) डॉ. ए. एस. किरण कुमार यांनी प्रदान केला. हा पुरस्कार WILSA टीम तर्फे आयोजित करण्यात आला होता. साहित्य आणि ज्ञानाच्या क्षेत्रात त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल विवान यांना हा सन्मान देण्यात आला.
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी विवान कारुळकरांनी NEOs (पृथ्वीजवळील वस्तू) वर तत्वतः पेटंट मिळवले, यासोबतच ते जगातील सर्वात तरुण पेटंट धारकांपैकी एक बनले. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी त्यांचे पहिले पुस्तक “द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स” लिहिले. यात त्यांनी वेदांच्या आधारे आधुनिक पाश्चात्य विज्ञान हे केवळ वैदिक ज्ञानाची प्रत असल्याचा दावा केला. हे पुस्तक अयोध्या राम मंदिरात प्राण-प्रतिष्ठेच्या वेळी रामलल्लाच्या चरणी अर्पण करण्यात आले.
वयाच्या १७ व्या वर्षी, विवान कारुळकरांचे दुसरे पुस्तक “The Sanatan Dharam: True Source of All Technology” दिल्ली येथे आदरणीय सरसंघचालक श्री मोहन भागवत, इस्रोचे अध्यक्ष श्री एस. सोमनाथ आणि नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते प्रकाशित झाले. वयाच्या १८ व्या वर्षी, विवानने त्यांचे तिसरे पुस्तक “एलोन मस्क: द मॅन हू बेंड्स रिअॅलिटी” प्रकाशित केले, जे त्यांनी मस्क यांच्या वाढदिवसानिमित्त (२८ जून २०२५) प्रकाशित केले.
हे ही वाचा :
‘काकोरी घटने’तील क्रांतिकारांना गृहमंत्र्यांकडून श्रद्धांजली, काय आहे घटना?
संरक्षण क्षेत्रात भारताची भरारी – पाच वर्षांत उत्पादनात ९०% वाढ
रविचंद्रन अश्विन सीएसकेची साथ सोडण्याची शक्यता
इंग्लंडमध्ये सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदरला अटक
यापूर्वीही, विवानला संयुक्त राष्ट्रांना विशेष निमंत्रण मिळाले होते, जिथे त्यांच्या पुस्तक सादर करण्यात आले. त्यांना बकिंगहॅम पॅलेसकडून रॉयल बॅज आणि नाणे देण्यात आले होते आणि यूकेच्या पंतप्रधानांकडून १० डाउनिंग स्ट्रीटला आमंत्रण देखील मिळाले होते. भारतीय सैन्याने त्यांना प्रशस्तिपत्रक आणि प्रशंसा पदक देऊन सन्मानित केले, आणि हा सन्मान मिळवणारे सर्वात तरुण लेखक ठरले.
विवानची कामे केवळ भारतच नव्हे तर स्वित्झर्लंड, अमेरिका, युके, नेपाळ, श्रीलंका आणि इतर अनेक देशांच्या संसद आणि विद्यापीठांपर्यंत पोहोचली आहेत. IIT पटना कडून मिळणारा हा साहित्यिक उत्कृष्टता पुरस्कार विवानच्या अद्वितीय साहित्यिक आणि वैज्ञानिक योगदानाची अधिकृत पावती म्हणून पाहिला जात आहे.








