27.1 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरस्पोर्ट्सइंग्लंडमध्ये सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदरला अटक

इंग्लंडमध्ये सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदरला अटक

Google News Follow

इंग्लंड दौऱ्यावर गेलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अलीला यूके पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली असली तरी तपास पूर्ण होईपर्यंत तो देश सोडू शकणार नाही. या घटनेनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हैदर अलीवर निलंबनाची कारवाई केली आहे.

ग्रेटर मँचेस्‍टर पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटलंय की, २४ वर्षीय व्यक्तीला बलात्काराच्या आरोपात अटक केली आहे. २३ जुलै २०२५ रोजी मँचेस्टर परिसरात संबंधित घटना घडली, असा आरोप त्याच्यावर आहे. अटकेच्या कारवाईनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली असून आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत, असे पोलिसांनी म्हटले आहे. पाकिस्तानी वंशाच्या तरुणीनं केलेल्या गंभीर आरोपानंतर तक्रार दाखल करुन तपास सुरु केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानी क्रिकेटरला बेकहॅम ग्राउंडवर वनडे सामना सुरु असताना अटक करण्यात आली. पाकिस्तानी शाहीन संघ २७ जुलै ते ६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत इंग्लंड दौरा केला. या दरम्यानच हा धक्कादायक प्रकार घडला असा आरोप क्रिकेटरवर करण्यात आला आहे. अटकेच्या कारवाईनंतर त्याची जामिनावीर सुटका झाली असली तरी पासपोर्ट जप्त करण्यात आला असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही त्याला निलंबित केले आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) प्रवक्त्याने सांगितले की, “आम्हाला अटकेची माहिती देण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत हैदरला निलंबित करण्यात आले आहे आणि आम्ही आमची चौकशी यूकेमध्ये करू. या कठीण काळात बोर्ड हैदरला कायदेशीर मदत करेल. हैदर अली पाकिस्तान ए टीमसोबत इंग्लंडमध्ये होता, जिथे इंग्लंड लायन्सविरुद्ध सामने सुरू होते. बैकेनहेम ग्राउंडवर सामना सुरू असताना मॅंचेस्टर पोलिसांनी अलीला अटक केली.

हैदर अलीने पाकिस्तानसाठी २ वनडे आणि ३५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. टी२० मध्ये त्याने १२४ स्ट्राइक रेटने ५०५ धावा केल्या आहेत, ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने २०२३ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आपला शेवटचा टी२० सामना खेळला होता. त्याची लवकरच पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, या घटनेमुळे हैदर अलीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन कठीण होऊ शकते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा