पाण्याशिवाय पाकची तडफड; फिल्डमार्शल मुनीर लालेलाल!

पाण्यासंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही!

पाण्याशिवाय पाकची तडफड; फिल्डमार्शल मुनीर लालेलाल!

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी संताप व्यक्त करत भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. पाकिस्तान पाण्याच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे मुनीर यांनी म्हटले आहे. पाणी हा २४ कोटी पाकिस्तानी लोकांचा मूलभूत अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले. गुरुवारी (२९ मे) विविध विद्यापीठांमधील कुलगुरू, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांशी बोलताना मुनीर म्हणाले, ‘पाणी ही आपली लाल रेषा आहे. आम्हाला भारताचे वर्चस्व अजिबात मान्य नाही.

पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचे दुखणे पुन्हा एकदा उघड झाले, मुनीर म्हणाले की, पाण्याच्या मुद्द्यावर इस्लामाबाद कधीही तडजोड करणार नाही कारण ते देशातील २४ कोटी लोकांच्या मूलभूत हक्कांशी जोडलेले आहे. यावेळी फील्ड मार्शल मुनीर यांनी स्पष्ट केले की पाकिस्तान काश्मीर वादावर कधीही तडजोड करणार नाही. पाकिस्तान काश्मीरला विसरणार नाही आणि सोडणारही नाही, भारताला हे समजून घ्यावे लागेल, असे मुनीर म्हणाले.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार मोडला. यानंतर पाकिस्तान संतापला आहे. भारताच्या या कारवाईमुळे येत्या काळात पाकिस्तानला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

हे ही वाचा : 

ई-कॉमर्सवर बेकायदेशीर वॉकी-टॉकी विक्रीला बंदी

डिप्रेशनमुळे डिमेन्शिया होण्याचा धोका वाढतो, नव्या संशोधनात धक्कादायक उलगडा

महिलांसाठी अमृतसारखी ठरणारी ‘किशमिश’

न्यूजीलंडचे माजी क्रिकेट प्रशिक्षक डेविड ट्रिस्ट यांचे निधन

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची ४० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. पाण्याअभावी पिके नष्ट होऊ शकतात, ज्यामुळे अन्न संकट आणि महागाई वाढेल. सिंध आणि बलुचिस्तान सारख्या भागात आधीच पाण्याची कमतरता आहे. करार निलंबित केल्याने हे अधिक गंभीर होऊ शकते. तसेच पाण्याच्या कमतरतेचा वीज निर्मिती आणि उद्योगांवर परिणाम होईल, ज्यामुळे पाकिस्तानची आधीच कमकुवत अर्थव्यवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version