27 C
Mumbai
Monday, June 16, 2025
घरविशेषई-कॉमर्सवर बेकायदेशीर वॉकी-टॉकी विक्रीला बंदी

ई-कॉमर्सवर बेकायदेशीर वॉकी-टॉकी विक्रीला बंदी

Google News Follow

Related

केंद्र सरकारनं नविन मार्गदर्शक तत्त्व जारी केली

नवी दिल्ली, ३० मे (आयएएनएस) – केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (CCPA) ने शुक्रवारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बेकायदेशीर वॉकी-टॉकी आणि रेडिओ उपकरणांच्या विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी नविन नियमावली जारी केली आहे.

‘रेडिओ उपकरणांच्या अनधिकृत लिस्टिंग आणि विक्री प्रतिबंध व नियमन मार्गदर्शक तत्त्वे, २०२५’ हे नविन दिशानिर्देश वायरलेस उपकरणांची अनधिकृत विक्री रोखणे आणि ग्राहक सुरक्षेला प्राधान्य देणे या उद्दिष्टांसाठी तयार करण्यात आले आहेत.

मंत्रालयाने स्पष्ट केलं की, हे उपकरण ग्राहकांना त्यांच्या कायदेशीर वापराबाबत चुकीची माहिती देऊ शकतात, तसेच कायदा अंमलबजावणी आणि आपत्कालीन सेवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या नेटवर्कमध्ये अडथळा निर्माण करू शकतात.

हे मार्गदर्शक तत्त्व दूरसंचार विभाग (DOT) आणि गृह मंत्रालय (MHA) यांच्याशी सविस्तर सल्लामसलतीनंतर तयार करण्यात आले आहेत.

तपासणीत असं आढळलं की अनेक ई-कॉमर्स साईट्सवर वॉकी-टॉकी सारखी उपकरणं वायरलेस ऑपरेटिंग लायसन्स शिवाय विकली जात आहेत, आणि या उत्पादनांच्या लिस्टिंगमध्ये लायसन्सची आवश्यकता असल्याचं स्पष्ट नमूद केलेलं नाही.

नवीन नियमांनुसार आता फक्त अधिकृत आणि कायदेशीर वॉकी-टॉकी उपकरणंच ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असतील. तसेच, फ्रिक्वेन्सी, तांत्रिक बाबी आणि वापराची स्पष्ट माहिती देणं बंधनकारक असणार आहे.

याशिवाय, ग्राहकांना चुकीची माहिती देणारे जाहिराती वा लिस्टिंग पूर्णतः बंद करण्याचे निर्देश आहेत.

हे नवीन मार्गदर्शक तत्त्व ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ अंतर्गत कारवाई, दंड व अंमलबजावणी यांची रूपरेषा स्पष्ट करतात.

मंत्रालयानं सांगितलं की, या नव्या मार्गदर्शक तत्त्वांच्या माध्यमातून ग्राहक जागरूकता वाढवणे, विक्रेत्यांची पार्श्वभूमी तपासणे, अनधिकृत उत्पादनांची आपोआप ओळख व काढून टाकण्याचं यंत्रणा लागू करणं, आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई सुनिश्चित करणं, हे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा