29 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेष‘आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही’

‘आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही’

गावस्कर, हरभजनने ‘तथाकथित दिग्गज’ क्रिकेटपटूंचे तोंड केले बंद

Google News Follow

Related

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि भारताचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग यांनी भारतीय क्रिकेटबद्दल सतत आपले विचार मांडणाऱ्या परदेशी क्रिकेटपटूंवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी एवढी तीव्र प्रतिक्रिया का दिली, हे स्पष्ट झाले नसले तरी भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदावर एका माजी क्रिकेटपटूने टीका केल्याचे समोर आले आहे. त्यावरून हा वाद निर्माण झाला, असे मानले जाते.

भारताच्या संघाची रचना, त्यांची निवड, फलंदाजी क्रम आणि इतर गोष्टींबद्दल नियमितपणे भाष्य करणाऱ्या इतर देशांच्या माजी क्रिकेटपटूंना गावस्कर यांनी कठोर संदेश देत ‘भारताला तुमच्या सल्ल्याची गरज नाही,’ असे स्पष्ट शब्दांत सुनावले.
‘एक दक्षिण आफ्रिकन म्हणतो ‘अमुक संघात असायला हवा होता’, एक ऑस्ट्रेलियन म्हणतो ‘तमुक संघात असायला हवा होता. हा त्यांच्याशी संबंधित विषय कसा आहे? त्यांना याची चिंता का वाटावी? ते आमचे निवड समिती सदस्य नाहीत. असे बरेचदा घडते. कोणीतरी म्हणते, ‘त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज नाही,’ असे गावस्कर यांनी कठोर शब्दांत या माजी क्रिकेटपटूंना सुनावले आहे.
हरभजन सिंगनेही सुनील गावस्कर यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे.
‘माजी भारतीय क्रिकेटपटूंपैकी कोणीही इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाबाबत भाष्य करत नाहीत. त्यामुळे त्यांचे ‘तथाकथित’ दिग्गज भारताच्या निवडी आणि संघ संयोजनाविषयी भाष्य करताना पाहून आश्चर्यचकीत वाटते,’ असे हरभजनसिंग म्हणाला.

हे ही वाचा:

आमदार रवींद्र वायकर यांनी तथ्य दडपले!

रशिया-युक्रेन युद्धामुळे विभागलेल्या जगाला भारत एकत्र आणू इच्छितो!

जी-२० परिषदेच्या भारत मंडपममध्ये सजला कलामेळा

अमरावतीत साकारणार नवीन विभागीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत

‘मी या मताशी १०० टक्के सहमत आहे. त्यांच्या कारकिर्दीत आपापल्या संघांसाठी खेळल्यानंतर, ते आता भारतीय संघांची निवड करत आहेत. हे कसे घडते? या गोष्टीचे मला आश्चर्य वाटते. कोणीही आम्हाला इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाला जाऊ देत नाही किंवा त्यांचा संघ बनवा, असे सांगत नाही. परंतु हे तथाकथित दिग्गज भारताबद्दल भाष्य करतात आणि तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोणी यावं, प्रथम गोलंदाजी कोणी करावी किंवा शेवटचे षटक कोणी टाकावे, याचा अनाहूत सल्ला देतात. व्वा!’ अशी प्रतिक्रिया हरभजनने दिली.
गावस्कर आणि हरभजन यांचे म्हणणे अंशतः बरोबर आहे. परदेशातील अनेक माजी क्रिकेटपटू नियमितपणे भारतीय क्रिकेट आणि त्यांच्या संघाबद्दल त्यांचे विचार मांडतात. भारताच्या कामगिरीवरही ते टीका करतात. परंतु त्यांना पूर्णपणे दोष देणे योग्य नाही. ते त्यांचे विचार प्रामुख्याने ‘होस्ट ब्रॉडकास्टर्स’शी शेअर करतात, जे त्यांना भारताच्या सामन्यांदरम्यान किंवा भारताचा सहभाग असलेल्या स्पर्धांमध्ये तज्ञांच्या विश्लेषणासाठी मोठी रक्कम देतात.

सध्या सुरू असलेल्या आशिया कप २०२३चे उदाहरण घ्या. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या सहभागी राष्ट्रांमधील माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांव्यतिरिक्त सुपर ४मध्ये मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), अँडी फ्लॉवर (झिम्बाब्वे) आणि डॉमिनिक कॉर्क (इंग्लंड) यांसारखे माजी क्रिकेटपटू ब्रॉडकास्टिंग टीमचा एक भाग आहेत आणि ही काही पहिलीच वेळ नाही. अन्य देशांतील माजी क्रिकेटपटूंना नियमितपणे भारतीय मालिकेच्या समालोचन पॅनेलमध्ये आमंत्रित केले गेले आहे. अशा मालिका किंवा स्पर्धेदरम्यान साहजिकच बहुतांश चर्चा भारतीय संघाचीच असते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा