28.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरविशेषपश्चिम रेल्वेच्या ९ जोड्या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ

पश्चिम रेल्वेच्या ९ जोड्या विशेष गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ

Google News Follow

Related

आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ९ जोड्या विशेष रेल्वेगाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची सोय आणि अतिरिक्त गर्दीचे नियोजन करण्यासाठी या विशेष गाड्यांच्या एकूण १७४ अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि उधना येथून धावणाऱ्या विशेष गाड्यांचा यात समावेश आहे. भिवानी, मऊ, भुज, वेरावळ आणि अयोध्या कॅंट या मार्गांवर या गाड्या धावणार आहेत.

लखनऊ स्थानकावर थांबा रद्द; ऐशबाग जंक्शनवर थांबा

लखनऊ स्थानकावर सुरू असलेल्या आरएलडीएच्या कामामुळे उधना-अयोध्या कॅंट विशेष गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. ट्रेन क्रमांक ०९०९३/०९०९४ आणि ०९०९७/०९०९८ या दोन्ही दिशांना मानक नगर–ऐशबाग जंक्शन–मल्हौर मार्गे धावतील. या गाड्या लखनऊ स्थानकावर थांबणार नसून, त्याऐवजी ऐशबाग जंक्शन येथे थांबा देण्यात आला आहे.

मुंबई सेंट्रल–मऊ विशेष गाडीचा मार्ग बदल

लखनऊ येथे सुरू असलेल्या कामामुळे ट्रेन क्रमांक ०९१८३/०९१८४ मुंबई सेंट्रल–मऊ विशेष गाडीचा मार्ग बदलण्यात आला आहे. ही गाडी कानपूर सेंट्रल–सूबेदारगंज–प्रयागराज रामबाग–ज्ञानपूर रोड–बनारस–वाराणसी जंक्शन–औंड़िहार जंक्शन मार्गे धावेल.

लखनऊ, रायबरेली जंक्शन, अमेठी, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ जंक्शन, जंघई जंक्शन आणि भदोही येथे या गाड्यांना थांबा राहणार नाही. तर सूबेदारगंज, ज्ञानपूर रोड, वाराणसी जंक्शन आणि औंड़िहार जंक्शन येथे अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत.

२३ सप्टेंबरपासून आरक्षण सुरू

विस्तारित फेऱ्यांचे आरक्षण २३ सप्टेंबर २०२६ पासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. गाड्यांच्या वेळा, थांबे आणि डब्यांच्या रचनेची सविस्तर माहिती प्रवाशांना www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा