‘द लॅन्सेट पब्लिक हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नव्या अभ्यासानुसार, दररोज ७,००० पावले चालल्यास कॅन्सर, डायबेटीस, डिप्रेशन, डिमेन्शिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. या अभ्यासात ५७ स्वतंत्र संशोधनांचा समावेश असून, १,६०,००० हून अधिक प्रौढांचा डेटा तपासण्यात आला.
अभ्यासानुसार, दररोज ७,००० पावले चालल्यास हृदयरोगाचा धोका २५ टक्क्यांनी, कॅन्सरचा धोका ६ टक्क्यांनी, टाइप २ डायबेटीसचा धोका १४ टक्क्यांनी, डिमेन्शिया (स्मृतिभ्रंश) ३८ टक्क्यांनी, डिप्रेशनचा धोका २२ टक्क्यांनी, अपघाती पडण्याची शक्यता २८ टक्क्यांनी कमी होते. तसेच, मृत्यूचा एकूण धोका सुमारे ५० टक्क्यांपर्यंत घटतो.
हेही वाचा..
राहुल गांधींच्या वक्तव्याने पाकमधील दहशदवादी आनंदित
पाकिस्तानी पासपोर्ट अजूनही सर्वात दुर्बल
सांगली ड्रग्स फॅक्टरी प्रकरण : केमिकल पुरवठादाराला गुजरातमधून केली अटक
RSS ची अधिकारी असल्याचे सांगत महिलेचा भाजप नेत्याला ४१ लाखांचा गंडा!
सध्या दररोज १०,००० पावले चालण्याचे अनौपचारिक उद्दिष्ट मानले जाते. मात्र, या अभ्यासात असे सूचवण्यात आले आहे की ७,००० पावले हे कमी सक्रिय असलेल्या लोकांसाठी अधिक व्यवहार्य आणि उपयुक्त लक्ष्य आहे. ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाच्या चार्ल्स पर्किन्स सेंटरमधील प्रा. डिंग डिंग यांनी सांगितले, “१०,००० पावले हे अतिशय सक्रिय लोकांसाठी योग्य असू शकते, परंतु दररोज ७,००० पावले चालणे हे आरोग्यासाठी लक्षणीय फायदे देते आणि सर्वसामान्यांसाठी साध्य असलेले एक लक्ष्य आहे.
या अभ्यासात हे देखील आढळले की दररोज फक्त ४,००० पावले चालणे देखील केवळ २,००० पावलांपेक्षा अधिक फायदेशीर आहे. काही बाबतीत जसे की हृदयविकार, ७,००० पावलांपेक्षा अधिक चालल्यास फायदा अधिक असतो. मात्र बहुतेक आजारांसाठी ७,००० पावलांनंतर फायदा स्थिर होतो. संशोधकांनी या अभ्यासातील काही मर्यादांची नोंद घेतली असून त्यांनी मान्य केले की, कॅन्सर व डिमेन्शिया संबंधी विश्लेषण आयुवर्गावर आधारित मर्यादांमुळे काही प्रमाणात अपूर्ण राहिले आहे. तरीही, हे संशोधन पावलांची संख्या मोजणे हे शारीरिक हालचालींचे एक सोपे व प्रभावी साधन ठरू शकते, असे नमूद करण्यात आले आहे. संशोधकांचा विश्वास आहे की हे निष्कर्ष भविष्यात सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांना नवे परिमाण देतील. हे एक सहज, व्यावहारिक उपाय असून लोकांना अधिक चालण्यासाठी प्रेरित करू शकते.







