कुंभ का कोई मतलब नहीं है, यह फालतू है!

लालू प्रसाद यादव यांचे वादग्रस्त विधान

कुंभ का कोई मतलब नहीं है, यह फालतू है!

महाकुंभ मेळ्यात लाखो लोक सहभागी होत असून संगमात स्नान करण्याऱ्या भक्तांची संख्या ५० करोडच्या पुढे गेली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेत्यांनीही कुंभमेळ्यात आपला सहभाग नोंदवला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. याच दरम्यान, देशाचे माजी रेल्वे मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभ मेळ्यावरून वादग्रस्त विधान केले आहे. ‘कुंभ का कोई मतलब नहीं है, यह फालतू है’ ( कुंभ म्हणजे काय? कुंभ निरुपयोगी आहे) असे लालू यादव म्हणाले आहेत.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी घटनेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वक्तव्य केले. लालू प्रसाद यादव म्हणाले, चेंगराचेंगरीची घटना अत्यंत दुर्दैवी असून पीडितांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या अपघाताला त्यांनी पूर्णपणे रेल्वेला जबाबदार धरले आणि म्हटले की रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळेच इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला. रेल्वेमंत्र्यांनी ही संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. महाकुंभ मेळ्यात ज्या प्रमाणे गर्दी वाढत आहेत, तुमचे यावर काय मत आहे?, असा प्रश्न यादव यांना विचारण्यात आला. यावर लालू यादव म्हणाले, कुंभ म्हणजे काय?’ कुंभ निरुपयोगी आहे.

हे ही वाचा : 

नवी दिल्ली : प्लॅटफॉर्मवर अचानक गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी, १८ जणांचा मृत्यू!

नरेंद्र मोदींचा ‘राजीव गांधी’ करण्यासाठी आखला जात होता कट

ठाकरे गटाची अवस्था म्हणजे रस्सी जळाली पण पिळ जात नाही

ट्रम्प, नेत्यान्याहू यांच्या इशाऱ्यानंतर हमास नरमला; तीन इस्रायली बंधकांना सोडले

दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १४ महिलांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिक लोक जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. प्लॅटफॉर्म अचानकपणे गर्दी वाढल्याने हा अपघात झाला, असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version