भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी रोना विल्सन याने दहशतवादी प्रकाश याला १८ एप्रिल २०१७ रोजी एक पत्र लिहिले होते. हे पत्र बरेच मोठे असून यात धक्कादायक बाब म्हणजे नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यावर पत्रात लिहिण्यात आले आहे. यासाठी लागणारे ८ करोडचे फंडिंग, ४०,००० राऊंड्स दारुगोळा याबद्दलही लिहिण्यात आले आहे. तसेच २०१७ च्या या पत्रात नरेंद्र मोदी यांना संपवण्यासाठी राजीव गांधींसारखी घटना घडवण्याची योजना करत असल्याचे म्हटले आहे.
पुढे पत्रात म्हटले आहे की, या योजनेत जोखीम आहे; योजना अयशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. पण, पक्ष आणि केंद्रीय समितीने या प्रस्तावावर विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रोड शो ला लक्ष्य करणे ही अधिक प्रभावी योजना असू शकते. स्नायपर रायफलने मारण्याची त्यांची योजना होती याचे फोटोही यात होते. यासाठीचे ८ करोडचे बजेट त्यांच्या केंद्रीय समितीने मान्य केले होते, अशी माहिती आहे.
रोना विल्सन याने प्रकाश याला २६ डिसेंबर २०१७ रोजी आणखी एक पत्र लिहिले होते. यात शस्त्रे कशी खरेदी करावीत यावर भाष्य करण्यात आले आहे. शस्त्रे मिळवण्यासाठी नेपाळमध्ये त्यांचे संपर्क असून मणिपूर हा पर्यायही असल्याचे पत्रात म्हटले होते. सरकारला मोठे नुकसान पोहचवण्याबद्दल यात लिहिण्यात आले होते. तसेच सरकारला अनेक काळापासून हे नुकसान पोहचवणे शक्य झाले नसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते. तसेच यासोबत शस्त्रांची छायाचित्रासह माहिती देण्यात आली होती. ही शस्त्रे मणिपूरमधील त्यांच्या संपर्कातून नेपाळमधून आणण्यात येणार होती. शस्त्रे नेपाळमधून आणताना दोन मार्गांनी आणली जाणार होती. यातील एक मार्ग होता कोलकाता मार्गे. ही शस्त्रे वेगवेगळ्या भागांमधून आणून नंतर येथे जोडली जाणार होती, असे अनेक धक्कादायक खुलासे या पत्रातून झाले.
एकूणच पंतप्रधानांना लक्ष्य करणे आणि देशभरात भीतीचे वातावरण निर्माण करणे ही उद्दिष्टे असल्याचे पत्रातून उघड झाले. हाच अर्बन नक्षलवाद आहे. भीमा कोरेगाव प्रकरण लक्षात घेता हा जातीय वाद असून असाच वाद मणिपूरमध्ये आहे. या वादांना इतिहास असला तरी या वादांमध्ये तिसऱ्या घटकाचा समावेश असतो. जगभरात अनेक ह्युमन राईट्स अधिवेशन पार पडतात त्याला अनेकदा इकडचे नक्षल नेते उपस्थित असतात. याला या पत्रांच्या तपासातून उघड करण्यात आले आहे. जातीय वादावर भाष्य करण्यासाठी अनेकदा या नेत्यांना परदेशात बोलावले जाते.
पंतप्रधान मोदी यांनी भारतातील शहरी नक्षलवादी मानसिकतेला प्रोत्साहन दिल्याबद्दल राजकीय पक्षांवर वारंवार टीका केली आहे. हे कथित पत्र भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडतेला असे गट कसे गंभीर धोका निर्माण करू शकतात याचे एक उदाहरण आहे.
हे ही वाचा..
४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद
ट्रम्प, नेत्यान्याहू यांच्या इशाऱ्यानंतर हमास नरमला; तीन इस्रायली बंधकांना सोडले
शनिदेवाची मूर्ती असलेल्या शीळेवर आता ब्रँडेड तेलच अर्पण करता येणार
यावरून, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी वारंवार नरेंद्र मोदींना मणिपूरमध्ये जाण्याचा आग्रह करत होते. दुसऱ्या बाजूला दहशतवादी पंतप्रधानांचा राजीव गांधी करण्याच्या तयारीत होते. आता या दोन्ही घटनांमध्ये काही समान सूत्र आहे का? हे एक तर दहशतवादी किंवा राहुल बाबा या दोघांनाचं ठाऊक.
राहुल गांधी वारंवार मा.मोदींना मणिपूरमध्ये जाण्याचा आग्रह करत होते. दुसऱ्या बाजूला दहशतवादी पंतप्रधानांचा राजीव गांधी करण्याच्या तयारीत होते.
आता या दोन्ही घटनांमध्ये काही समान सूत्र आहे का? हे एक तर दहशतवादी किंवा राहुल बाबा या दोघाच ठाऊक. pic.twitter.com/UzVwegtf7n— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 15, 2025