नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी (१५ फेब्रुवारी) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १४ महिलांसह १८ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना प्लॅटफॉर्म १३ आणि १४ वर रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. प्लॅटफॉर्मवर अचानक गर्दी वाढल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या गर्दीतील बहुतेक लोक महाकुंभ स्नानासाठी जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जखमींवर सध्या लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालय आणि लेडी हार्डिंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतीय रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना २५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली.
हे ही वाचा :
नरेंद्र मोदींचा ‘राजीव गांधी’ करण्यासाठी आखला जात होता कट
ठाकरे गटाची अवस्था म्हणजे रस्सी जळाली पण पिळ जात नाही
४० देशांतील युवा नेत्यांचा राज्यपालांशी संवाद
केसरी टूर्सचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांचे निधन
रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की, ही दुर्दैवी घटना रात्री १० वाजता प्लॅटफॉर्म १३ आणि १४ वर घडली. अचानक गर्दीमुळे प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेले काही प्रवासी बेशुद्ध पडले आणि त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्याची अफवा पसरली. यामुळे घबराट, गोंधळ निर्माण झाल्यामुळे ही दुर्घटना घडली.
गर्दी कमी करून नंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. अचानक झालेल्या अभूतपूर्व गर्दीच्या पार्श्वभूमीवर उत्तर रेल्वेने तात्काळ चार विशेष गाड्या रवाना केल्या. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,” असे रेल्वेच्या निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.