29.6 C
Mumbai
Wednesday, April 23, 2025
घरदेश दुनियाट्रम्प, नेत्यान्याहू यांच्या इशाऱ्यानंतर हमास नरमला; तीन इस्रायली बंधकांना सोडले

ट्रम्प, नेत्यान्याहू यांच्या इशाऱ्यानंतर हमास नरमला; तीन इस्रायली बंधकांना सोडले

तीन ओलिसांच्या बदल्यात इस्रायलकडून ३६९ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका

Google News Follow

Related

हमास दहशतवादी संघटनेने शनिवार दुपारपर्यंत ओलिसांची सुटका न केल्यास याचे परिणाम भोगावे लागतील आणि युद्धबंदीचा करार नष्ट होईल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला होता. यानंतर हमासने काहीशी माघार घेत शनिवारी तीन इस्रायली बंधकांची सुटका केली आहे. सुटका केलेल्यांमध्ये एका अमेरिकन नागरिकाचा समावेश आहे.

हमासने आयर हॉर्न (वय ४६ वर्षे), सागुई डेकेल-चेन, (वय ३६ वर्षे) आणि साशा (अलेक्झांडर) ट्रूफानोव्ह (वय २९ वर्षे) यांची सुटका केली. खान युनूसमधील एका व्यासपीठावर नेल्यानंतर त्यांना रेड क्रॉसच्या स्वाधीन करण्यात आले. या तीन ओलिसांना ३६९ पॅलेस्टिनी कैदी आणि बंदीवानांच्या बदल्यात परत करण्यात आले. मात्र, यामुळे युद्धबंदीच्या करार समाप्तीच्या इशाऱ्याची भीती कमी झाली आहे. हमासने सुटका केलेले तीनही जण चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून आले.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान हमासने रशियन इस्रायली साशा (अलेक्झांडर) ट्रूफानोव्हचे आई, आजी आणि मैत्रिणीसह अपहरण केले होते. २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या संक्षिप्त युद्धविरामात त्याची आई, आजी आणि मैत्रिणीची सुटका करण्यात आली होती. किबुट्झ निर ओझ येथील रहिवासी असलेला अमेरिकन इस्रायली सागुई डेकेल-चेन याला त्याच्या वर्कशॉपमध्ये असताना अपहरण करून नेण्यात आले होते. त्याची पत्नी सात महिन्यांची गर्भवती असताना त्याचे अपहरण झाले. त्याच्या दोन लहान मुली नऊ तास सुरक्षित खोलीत लपून बसल्यामुळे वाचल्या. नोव्हेंबर २०२३ मध्ये, मुक्त केलेल्या ओलिसांनी त्याच्या कुटुंबाला सांगितले की तो गाझामध्ये सुरक्षित आहे पण जखमी आहे. डेकेल-चेनच्या अपहरणानंतर दोन महिन्यांनी त्याच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला आणि तिचे नाव शचर ठेवले, ज्याचा हिब्रूमध्ये अर्थ पहाट असा होतो.

हेही वाचा..

शनिदेवाची मूर्ती असलेल्या शीळेवर आता ब्रँडेड तेलच अर्पण करता येणार

मुंबईतील रंगशारदा नाट्य मंदिरात राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा

नवा विक्रम! महाकुंभ मेळ्यादरम्यान आतापर्यंत प्रयागराज विमानतळावर उतरली ६५० चार्टर्ड विमाने

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध असल्या कारणावरून तीन सरकारी कर्मचारी बडतर्फ

अर्जेंटिनामध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या आयर हॉर्न ७ ऑक्टोबर २०२३ रोजी किबुट्झ निर ओझ येथून हमासने त्याचा भाऊ एटानसह अपहरण केले होते. एटान अजूनही हमासच्या कैदेत आहे. ४६ वर्षीय आयर हॉर्न हे १९९९ मध्ये इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले आणि किबुट्झ निर ओझ येथे एका कम्युनिटी पबचे व्यवस्थापन करतात. ते एक स्टँड-अप कॉमेडियन आणि रेडिओ ब्रॉडकास्टर देखील आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा