पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत ध़डक मारणारी विनेश फोगाट अतिरिक्त वजनामुळे अपात्र झाल्यानंतर भारतातल्या विरोधी पक्षांनी त्याचे राजकारण कसे करता येईल, याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. हरयाणातल्या काँग्रेसनेही याचा फायदा उठविण्याचे ठरविले पण विनेश फोगाटच्या काकांनी त्यांचे हे प्रयत्न चितपट केले.
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी म्हटले आहे की, विनेश फोगाटला राज्यसभेसाठी नामनिर्देशित करायला हवे. काँग्रेस पक्षाकडे राज्य विधानसभेत तेवढी संख्या असती तर तिचे राज्यसभेसाठी पाठवले असते.
ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. कुस्ती खेळण्यातली ताकद आता आपल्याकडे नाही, असे म्हणत तिने निवृत्ती जाहीर केली.
विनेश फोगाटचे काका महावीर फोगाट यांनी म्हटले आहे की, माझी मुलगी गीता फोगाट हिने अनेक पदके जिंकली तरीही तिला राज्यसभा सदस्य करण्याबाबत विचार केला गेला नाही. तेव्हा काँग्रेसचे सरकार होते तर गीताला राज्यसभा सदस्य का केले नाही?
महावीर फोगाट म्हणाले की, गीताने अनेक विक्रम रचले. पण जेव्हा भूपिंदर सिंग हुड्डा हे सत्तेत होते तेव्हा त्यांनी गीताला उपअधीक्षकही केले नाही. आता ते विनेशच्या बाबतीत कसला दावा करत आहेत?
दरम्यान, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी कुस्तीपटू विनेश फोगाट यांच्यावरून काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यावर हल्ला चढवला आहे. माजी मुख्यमंत्री खेळाडूंचे हितचिंतक असल्याचे भासवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी सल्ला देत अशा गंभीर मुद्द्यांवर राजकारण करू नका असे सांगितले.
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, भूपेंद्र सिंह हुड्डा तुम्ही जे खेळाडूंचे हितचिंतक असल्याचे नाटक करत आहात, तुम्ही सांगा तेव्हा आपण काय केले होते जेव्हा गीता फोगाट आणि बबिता फोगाट यांनी मेडल जिंकून रेकॉर्ड बनवले होते?
ते पुढे म्हणाले की, “क्रीडा धोरणानुसार, पदक जिंकल्यानंतर गीता आणि बबिता यांना डीएसपी का करण्यात आले नाही? तुम्ही सरकारमध्ये असताना विजेत्या खेळाडूंचे हक्क का हिरावून घेतलेत, गीता आणि बबिता यांना राज्यसभेवर का पाठवले नाही?, असा सवाल त्यांनी विचारला.
हे ही वाचा:
वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर!
विनेश ही अनुभवी खेळाडू, तिला नियमांचीही जाणीव का नव्हती? सायनाने विचारला सवाल
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील नागरिकांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांची एस जयशंकर यांच्याशी चर्चा
मैत्रिणीला आयफोन खरेदीकरण्यासाठी ९ वीच्या विद्यार्थ्याचा आईच्या दागिन्यांवर डल्ला !
मुख्यमंत्री सैनी यांनी हुड्डा यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, भूपेंद्र हुड्डा जी, तुम्ही नेहमीच खेळाडूंच्या भावनांशी खेळून तुम्ही तुमच्या राजकीय भाकऱ्या भाजून घेतल्या आहेत. कृपया करून खेळाडूंच्या भवितव्याशी संबंधित संवेदनशील मुद्द्याचे राजकारण करू नका. आमचे सरकार राजकारणावर नाही तर रणनीतीवर विश्वास ठेवते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काय म्हणाले भूपेंद्र सिंह हुड्डा?
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी गुरुवारी (८ ऑगस्ट) म्हणाले की, जर काँग्रेसकडे राज्य विधानसभेत पुरेसे संख्याबळ असते तर त्यांनी कुस्तीपटू विनेश फोगट यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली असती. प्रसारमाध्यमांशी बोलताना हुड्डा म्हणाले, आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी विनेशने केली आहे. त्यांना राज्यसभेवर पाठवले पाहिजे. ती हरलेली नाही, ती जिंकली आहे आणि तरुणांसाठी ती प्रेरणा आहे.
भूपेंद्र हुड्डा जो आप आज खिलाड़ियों के हितैषी बनने का नाटक कर रहे हैं आप बताएं कि:
▪️आपने तब क्या किया था जब गीता फोगाट और बबीता फोगाट ने मेडल जीतकर रिकॉर्ड बनाए थे ?
▪️खेल नीति के अनुसार मेडल जीतने के बाद गीता और बबीता को DSP क्यों नहीं बनाया ?
▪️आपने विजेता खिलाड़ियों को… https://t.co/sy3mbp3m13
— Nayab Saini (@NayabSainiBJP) August 8, 2024







