23 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरविशेषकॅनडाला अमेरिका, ब्रिटनचा पाठिंबा नाही!

कॅनडाला अमेरिका, ब्रिटनचा पाठिंबा नाही!

पश्चिमी देशांच्या गणनेत कॅनडा पेक्षा भारत महत्वाचा

Google News Follow

Related

भारत आणि कॅनडा सध्या अभूतपूर्व राजनैतिक संकटाचा सामना करत आहेत.दोन्ही देशांच्या वादात प्रमुख देशांनी मात्र कॅनडाचे समर्थन केलेले नाही.कारण, जर समर्थन केले तर राजकीय आणि भूराजकीय परिमाण संपूर्ण जगाला भोगावे लागेल.त्यामुळे कदाचित कॅनडाचे मित्र असूनही ते देश या मुद्यावर पाठिंबा देत नाहीत, असे चित्र आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी जूनमध्ये झालेल्या खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारत सरकारचा संभाव्य संबंध असल्याचा दावा केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली.अशा प्रकारच्या बातम्यांमुळे अंशतः मित्र पक्षांमध्ये खळबळ उठते पण यावेळी तसे काही झाले नाही.भारताने G२० शिखर परिषदेचे यजमानपद भूषवल्यानंतर काही दिवसातच कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतावर आरोप करून पाश्चिमात्य देशांना अडचणीत आणले आहे.

हे ही वाचा:

शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!

छोटा राजनचा नवा अवतार, लॉरेंस बिश्नोई…

शरद पवार, राहुल गांधींना मुस्लिम मतं हवीत; पण आम्ही नको!

ओंकारेश्वरला उभी राहिली आदि शंकराचार्यांची भव्य मूर्ती !

युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडाच्या युतीला ‘फाईव्ह आयज’ म्हणून ओळखले जाते परंतु या गटातील कोणत्याही देशाने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येतील सहभागाबद्दल आतापर्यंत भारताचा निषेध केलेला नाही.मात्र, दोन्ही देशांच्या वादावर चिंता व्यक्त केली असून या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.हे शक्य झाले आहे कारण अमेरिकेसह अनेक पश्चिमी देश भारताला चीनपेक्षा अधिक शक्तिशाली देश म्हणून पहिले जाते.हे प्रामुख्याने चीनमुळे घडल्याचे भू-राजकारणातील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बीजिंगच्या वाढत्या सामर्थ्याला विरोध करण्यासाठी पश्चिमी देशांना भारतासोबतचे संबंध अधिक मजबूत करायचे आहेत.कॅनडाचे काही महत्वाचे मित्र राष्ट्र आहेत त्यांचीही हीच भूमिका असल्याने कोणताही देश भारताला नाराज करू शकत नाही.
अल जझीरा अहवालानुसार, चीनशी समतोल राखण्यासाठी पश्चिमी देशांच्या गणनेत कॅनडा पेक्षा भारत महत्वाचा आहे , असे ओटावा येथील कार्लटन आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील प्राध्यापक स्टेफनी कार्विन यांनी सांगितले.यामुळेच कॅनडाला या प्रकरणात इतर पश्चिमी देशांकडून पाठिंबा मिळाला नसून तो एकटा पडला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा