26 C
Mumbai
Thursday, January 1, 2026
घरविशेषगुगली टाकून पवारांकडून उरलेले सत्य वदवून घेईन!

गुगली टाकून पवारांकडून उरलेले सत्य वदवून घेईन!

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना दिले आव्हान

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सामना गुरुवारी रंगला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर फडणवीसांनीही आपण लवकरच पूर्णसत्य समोर आणू असा स्पष्ट इशारा दिला आहे.

 

या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवारांशी बैठक झाली होती. त्यात सत्तास्थापनेचा मुद्दा चर्चिला गेला होता. पण या बैठकीनंतर तीन चार दिवसांनी शपथग्रहण करण्यापूर्वी शरद पवारांनी अंग काढून घेतले पण तरीही आम्ही शपथ घेतली. त्यावर शरद पवार म्हणाले की, मी अंग काढून घेतले तर शपथ का घेतली. पण, फडणवीस यांच्यासोबत बैठक झालीच नव्हती, असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले नाही.

 

फडणवीस हे सत्तास्थापनेसाठी अस्वस्थ होते. त्यामुळे ते कुणाशीही युती करून सत्तेत येऊ शकतात, हे आपल्याला दाखवून द्यायचे होते, म्हणून आम्ही हे डावपेच रचल्याचे शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. पवार म्हणाले होते की, माझे सासरे सदू शिंदे हे क्रिकेटपटू होते. गोलंदाज म्हणून त्यांनी अनेकांना बाद केले. तशीच मीही गुगली टाकली. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले की, “मला खूप आनंद आहे की, कमीतकमी नेमकं खरं काय होतं ते मी शरद पवार यांच्या तोंडावर मी आणू शकलो. पण हे सुद्धा अर्धसत्य आहे. उरलेलं सत्य देखील मी फार लवकर घेऊन येईन. मी सुद्धा गुगली फेकणार आणि उरलेलं सत्य बाहेर येईल. माझ्या एका गुगलीने हे सत्य तर बाहेर आणलंच. आता उरलेलं सत्यदेखील बाहेर येईलच. मी हळूहळू त्यांच्याकडूनच ते सत्य बोलून दाखवेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हे ही वाचा:

”चांद्रयान-३” १३ जुलैला अवकाशात झेपावणार

पवारांनी सोयीचा निर्णय घेतला, पण तोच अंगाशी आला

वीरेंद्र सेहवाग म्हणतो, यंदाचा वर्ल्डकप विराटसाठी जिंका!

कॅनडातून अमेरिकेत ८०० पेक्षा अधिक भारतीयांना घुसवले; भारतीयाला झाली शिक्षा

देवेंद्र फडणवीस यांनी या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी अजित पवारांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे म्हटले होते तर पवारांनी यानिमित्ताने डबल गेम खेळल्याचेही ते म्हणाले होते. शरद पवारांनी या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतानाच तेच विरोधकांच्या एकजुटीमुळे अस्वस्थ असल्याचा दावा केला. आपल्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर झालेला आरोप त्यांनी अमान्य केला. आपली कन्या कर्तृत्ववान आहे, ती तीनवेळा निवडून आली आहे. तिला संसदेतील सर्वोत्तम खासदार म्हणून अनेकवेळा पुरस्कार मिळालेला आहे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

 

नरेंद्र मोदी यांनी भोपाळला दिलेल्या भाषणात विरोधकांच्या मुलामुलींना निवडून आणायचे आहे की, आपल्या मुलामुलींची काळजी घ्यायची आहे, असे आवाहन जनतेला केले होते. त्यात शरद पवार, मुलायम सिंग, गांधी परिवार, करुणानिधी परिवार यांच्यावर कठोर टीका केली होती. त्यातून पवारांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांचा बचाव करण्याची कसरत केली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा