केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी लखनौला पोहोचले. या वेळी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवनियुक्त सिपायांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. या प्रसंगी मुख्यमंत्री योगींनी सांगितले की, “गेल्या आठ वर्षांत आम्ही न थांबता, न झुकता, न डगमगता काम केले आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पोलिसांची भरती आणि नियुक्ती पत्रांचे वाटप अशा काळात होत आहे, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशसेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या ११ वर्षांच्या कार्यकाळामुळे प्रत्येक भारतीयाच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. त्यांनी उपस्थित उमेदवारांना उद्देशून सांगितले की, “ट्रेनिंगमध्ये जितका घाम गळेल, ड्युटीवर तितका कमी रक्त गळेल.” तसेच त्यांनी सर्वांना उत्तम पोलीस कर्मचारी बनण्याचे आवाहन केले. “कोणीही असो — दलित, मागासवर्गीय, स्त्री वा पुरुष — आज सर्वांना कोणताही भेदभाव न करता भरतीत संधी मिळत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
योगी म्हणाले की, “पूर्वी पैसा दिल्याशिवाय कुणाचेही चयन होत नव्हते. पण आता आरक्षणाच्या नियमांचा आदर राखत पारदर्शक भरती केली जात आहे. गेल्या आठ वर्षांत आम्ही दोन लाखांहून अधिक भरती केल्या. आज उत्तर प्रदेशमध्ये आम्ही ट्रेनिंग क्षमतेची सुविधा ६०,००० पर्यंत वाढवली आहे. डबल इंजिन सरकारने आठ वर्षांत राज्यातील तरुणांना ८.५ लाखांहून अधिक सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. यामुळे परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि पवित्रतेचे उदाहरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा..
विश्वविख्यात जगन्नाथ रथयात्रेची तयारी जोरदार
पाक लष्करप्रमुख मुनीरना आम्ही बोलावलेले नाही!
ब्रिटिश फायटर जेटचे ‘इमर्जन्सी लँडिंग’
मुंबईतील अमेरिकन महावाणिज्य दूतावास कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, “यूपी पोलीस दलात आजपर्यंत ६०,२४४ तरुणांची भरती पूर्ण झाली आहे. पारदर्शकतेसह भरती करून आम्ही एक नवीन आयाम स्थापित केला आहे. शासनात गरीब, वंचित यांना वाटा मिळावा हा आमचा उद्देश आहे. ही केवळ एक भरती नव्हे, तर एक व्यापक प्रक्रिया आहे. उत्तर प्रदेश लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून देशातील सर्वात मोठं राज्य आहे आणि त्यामुळे येथे आव्हानंही मोठी आहेत. मात्र, आम्ही आठ वर्षांत न थांबता, न झुकता, न डगमगता काम केलं आहे. गरीब कुटुंबातील मुलेही आज सिपाही बनून जनतेची सेवा करण्यास सक्षम झाली आहेत.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी देखील मंचावरून संबोधित केले. त्यांनी नवनियुक्त सिपायांना विचारले, “कोणाकडून एक रुपयाही घेतलाय का?” सर्वांनी एकमताने उत्तर दिलं – “नाही.” त्यावर मौर्य म्हणाले, “पूर्वीच्या सरकारांत लाच दिल्याशिवाय नोकरी मिळत नव्हती. जेव्हा आम्ही उत्तर प्रदेश सरकारमध्ये नव्हतो, तेव्हा राज्यात गुंडगिरी आणि हिंसा भरलेली होती. पण आज तुम्ही अशा काळात पोलीस सेवेत प्रवेश करत आहात, जिथे कायदा-सुव्यवस्था आणि सुशासन आहे. आमचं एकच संकल्प आहे – उत्तर प्रदेशच्या जनतेची सुरक्षा, भ्रष्टाचारमुक्त भरती आणि ‘नकल माफियां’पासून मुक्ती.







