ज्ञानवापी येथील व्यासजी तळघरात पूजा करण्यास बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या मशीद समितीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (१ एप्रिल) सुनावली पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळत व्यासजी तळघरात पूजा सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे.याप्रकरणी मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर न्यायालयाने नोटीस बजावली असून आता जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
वाराणसी जिल्हा न्यायालयाने १७ जानेवारी रोजी ऐतिहासिक निकाल देताना हिंदू पक्षाला व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी कायम ठेवला होता. हे दोन निर्णय लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, १७ जानेवारी आणि ३१ जानेवारीच्या आदेशानंतर (तळघरात पूजा करण्याची परवानगी) मुस्लिम समुदाय ज्ञानवापी मशिदीमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय ‘नमाज’ अदा करतात. तिथली स्थिती कायम राखणे महत्त्वाचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
मयंक यादवचे जगभरातून होतेय कौतुक
कचथीवू बेटप्रकरणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फटकारले
‘तेल्याचा मुलगा मंदिराचे उद्घाटन कसे करू शकतो?’
अडवाणींना भारतरत्न प्रदान करताना पंतप्रधान मोदी यांनी केले प्रोटोकॉलचे पालन
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, ‘तळघराचा प्रवेश दक्षिणेकडून आहे आणि मशिदीचा प्रवेश उत्तरेकडून आहे. दोघांचाही एकमेकांवर परिणाम होत नाही. आत्तापर्यंत पूजा आणि नमाज दोन्ही आपापल्या ठिकाणी चालू ठेवाव्यात असा आदेश आम्ही देऊ शकतो, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.दरम्यान, याप्रकरणी मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर न्यायालयाने नोटीस बजावली असून आता जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.