30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरविशेषकुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत; शिस्तभंगाचा आरोप करत पॅरिस सोडण्याचे आदेश

कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत; शिस्तभंगाचा आरोप करत पॅरिस सोडण्याचे आदेश

कुस्तीपटू अंतिम पंघल ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान अडचणींमध्ये सापडली आहे

Google News Follow

Related

पॅरिस ऑलिम्पिकमधून कुस्तीपटू विनेश फोगाट हिला वाढलेल्या वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले. यामुळे पदकाची आशा असणाऱ्या भारताला मोठा धक्का बसला. दरम्यान, विनेश फोगाटचे प्रकरण ताजे असतानाच, आता कुस्तीपटू अंतिम पंघल ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान अडचणींमध्ये सापडली आहे. अंतिम पंघल हिला थेट पॅरीस सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंतिम पंघलचे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले असून त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

महिला कुस्तीपटू अंतिम पंघल आणि तिच्या बहिणीची पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अंतिम पंघल ही भारताची युवा कुस्तीपटू आहे. त्यामुळे तिला पॅरिस ऑलिम्पिकच्या क्रीडा ग्राममध्ये जाण्याची परवानगी आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूला एक खास ओळखपत्र दिले जाते. या ओळखपत्राशिवाय कोणत्याही खेळाडूला क्रीडा ग्राममध्ये प्रवेश दिला जात नाही. पण यावेळी वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले.

अंतिमने ज्या गावात सामना सुरू होता, तिथून आपलं काही सामाना आणण्यासाठी स्वतःचं अधिकृत ओळखपत्र तिच्या छोट्या बहिणीला दिलं. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी अंतिम हिच्या बहिणीला पकडलं. अशा परिस्थितीत फ्रेंच अधिकाऱ्यांकडून शिस्तभंगाचा आरोप झाल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अखेर भारतीय कुस्तीपटू अंतिम, तिची लहान बहिण आणि सपोर्ट स्टाफची रवानगी पुन्हा भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

कुस्तीपटू विनेश फोगाटचा कुस्तीला रामराम!

विनेश फोगाटसाठी कोणताही नियमांचा अपवाद नाही…तिला रौप्य दिले जाऊ शकत नाही…

बांग्लादेशात कम्युनिस्ट नेत्याची फासावर लटकवून हत्या !

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !

हा प्रकार ७ ऑगस्ट रोजी घडला. पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या अंतिमचा प्रवास पहिल्याच सामन्यात संपुष्टात आला. ५३ किलो वजनी गटातून खेळताना पात्रता फेरीच्या पहिल्याच सामन्यात अंतिम ०-१० ने पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली. माहितीनुसार, अंतिम पंघाल पराभवानंतर तिच्या खासगी प्रशिक्षकांना आणि स्पेरिंग पार्टनरला भेटायला गेली होती. त्यावेळेस तिने स्वतःचे खास ओळखपत्र बहीण निशाला दिले आणि खेळाडूंची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेल्या ऑलिम्पिक व्हिलेजमधून सामान घेऊन येण्यास सांगितले. मात्र, या ठिकाणी खेळाडू वगळता इतर कोणालाही प्रवेश नसतानाच बहिणीचं कार्ड वापरुन प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना अंतिमच्या बहिणीला म्हणजे निशाला सुरक्षारक्षकांनी पकडून ताब्यात घेतलं. शिवाय स्पर्धेतील अंतिमचं आव्हान संपुष्टात आल्याने आणि तिने नियमांचं उल्लंघन केल्याने तिला तातडीने पॅरिस सोडण्याचे आदेश भारतीय ऑलिम्पिक महासंघाने दिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा