22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
घरविशेषयशस्वीचे द्विशतक, बुमराहचा षटकार; भारत सुस्थितीत

यशस्वीचे द्विशतक, बुमराहचा षटकार; भारत सुस्थितीत

भारताने इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावात गुंडाळला

Google News Follow

Related

भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये सध्या कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पाहिल्या कसोटीत इंग्लंडने विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या कसोटीत मात्र आतापर्यंत झालेल्या खेळामध्ये भारताने आपली पकड मजबूत ठेवली आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सामन्यावर पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारताचा डाव ३९६ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने पुढच्या दोन सत्रात इंग्लंडच्या संघाचा पहिला डाव २५३ धावात गुंडाळला.

भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या खेळाच्या बळावर भारताने आपली पकड मजबूत केली आहे. यशस्वी जैस्वालचे द्विशतक आणि जसप्रीत बुमराहचा विकेट्सचा षटकार यामुळे सामन्याला रंगत चढली. दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला भारताने आपला पहिला डाव ३३४ धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. यशस्वी जैस्वाल आणि आर. अश्विन यांनी डाव पुढे नेला. अश्विन २० धावांवर असताना अँडरसनने त्याची विकेट घेतली. दरम्यान, यशस्वीने आपले पहिले द्विशतक पूर्ण केलं. यशस्वीने २९० चेंडूत द्विशतक ठोकले. भारताकडून कसोटीत द्विशतक ठोकणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. मात्र, द्विशतक पूर्ण केल्यानंतर तो बाद झाला. यशस्वी बाद इग्लंडचा गोलंदाज रेहानने बुमराहला ६ धावांवर तर बशीरने मुकेशला शुन्यावर बाद करत भारताचा पहिला डाव ३९६ धावांवर संपवला.

हे ही वाचा:

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार डीपफेक व्हिडीओची शिकार

राममंदिराबाबत बीबीसीने केलेल्या पक्षपाती वार्तांकनावर ब्रिटिश खासदार संतापला

संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत

आडवाणीजींना भारतरत्न ही लाखो कार्यकर्त्यांना सुखावणारी बाब

यानंतर इंग्लंडने पहिल्या डावाची आक्रमक सुरूवात केली होती. सलामीवीर झॅक क्राऊलीने ७८ चेंडूत ७६ धावा केल्या. त्यामुळे सामना इंग्लंडच्या बाजूने जाणार की काय अशी अवस्था होती. मात्र, भारतीय फिरकीपटू कुलदीपने बेन डकेटला बाद करत इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर पोप आणि क्राऊलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अक्षर पटेलने क्राऊलीला ७६ धावांवर बाद करत तंबूत धाडलं. ही जोडी फोडली. यानंतर बुमराहने इंग्लंडच्या रूट, ओली पोप आणि बेअरस्टोला बाद करत इंग्लंडच्या संघाला धक्के दिले. कुलदीप यादवने त्याला योग्य साथ दिली. दरम्यान, बेन स्टोक्सने ४७ धावा करत संघाची एक बाजू लावून धरली होती. मात्र, बुमराहने स्टोक्सचे अर्धशतक पूर्ण होऊ दिले नाही. त्यानंतर टॉम हार्टलीला २१ धावांवर तर जेम्स अँडरसनला ६ धावांवर बाद करत इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर संपवला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा