29 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरविशेषयोगेश कुंभेजकर यांनी वाशिम जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली

योगेश कुंभेजकर यांनी वाशिम जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली

Google News Follow

जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून योगेश कुंभेजकर यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील आणि निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी त्यांचे स्वागत केले.

बुवनेश्वरी एस. यांची राज्य शासनाने अकोला येथे महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे. त्यांच्या जागी वाशिम जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून योगेश कुंभेजकर यांची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले होते.

नुतन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर हे २०१६ बॅचचे आयएएस अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वी कामकाज पाहिले आहे. वाशिम येथे रुजू होण्यापूर्वी ते महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा