22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
घरविशेषमुंबई पोलिसांकडून खासदार साकेत गोखले यांच्या दाव्याची पोलखोल!

मुंबई पोलिसांकडून खासदार साकेत गोखले यांच्या दाव्याची पोलखोल!

बातमीचा विपर्यास केल्याचा पोलिसांचा दावा

Google News Follow

Related

मुंबईतील एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या ईडीविरोधातील वृत्ताचा तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी खोडसाळपणे विपर्यास केल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.‘तुम्ही ज्या बातमीचे वृत्त दिले आहे, त्यात चुकीची माहिती आहे आणि या संदर्भात आम्ही संबंधित वृत्तपत्राच्या संपादकांशीही संवाद साधला आहे. तुम्ही या बातमीचा तुमच्या सोयीने विपर्यास केला आहे. तुम्ही जाणुनबुजून केलेल्या या कृत्यामुळे तुम्हाला कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. हे जाणून घ्या,’ असे मुंबई पोलिसांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे.

भाजपला निधी मिळावा, यासाठी ईडी गुंडांचा वापर करून खंडणी गोळा करत असल्याचा दावा करणारे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे. या वृत्ताचा दाखला गोखले यांनी दिला आहे. मिडडे या मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्रात या संबंधीचे वृत्त प्रकाशित झाले आहे. त्यात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींनी १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा संशय आहे. या व्यक्तींचे ईडीतील काही अधिकाऱ्यांशी संगनमत झाल्याचा दावाही यात करण्यात आला आहे.

‘त्यांच्याकडे ईडीकडे असणाऱ्या तपासाशी संबंधित २०० गोपनीय फायली आहेत. या सर्व फायलींच्या प्रती ईडीकडून गुन्हेगारी टोळ्यांकडे कशा काय गेल्या? ईडी या माध्यमातून कंपन्यांना लक्ष्य करत आहे का? भाजपला निधी मिळावा, यासाठी कंपन्यांकडून खंडणी गोळा करता यावी, म्हणून गुन्हेगारी टोळ्यांना या फायली दिल्या गेल्या आहेत का?,’ असे ट्वीट गोखले यांनी केले होते.

हे ही वाचा:

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पंजाबचा रहिवासी ठार!

एनडीएचे घटकपक्ष वाढवण्यात भाजपचा पुढाकार!

तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तीन अधिकारी याच्याविरुद्ध लाचेचा गुन्हा दाखल

सायबर गुन्ह्याचा तपास करणारे अधिकारी, अंमलदार म्हणजे ‘सायबर कमांडो’

मुंबई पोलिसांनी या ट्वीटची त्वरित दखल घेऊन गोखले यांनी वृत्ताचा त्यांच्या सोयीने विपर्यास केल्याचे म्हटले आहे. या बातमीत नमूद केलेली माहिती चुकीची असून याबाबत संबंधित वृत्तपत्राच्या संपादकांना कळवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

एका बांधकाम व्यावसायिकाकडून १६४ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने खारमधील रहिवासी हिरेन भगत याला अटक केली आहे. त्याच्याकडून या गुन्ह्याशी संबंधित १३ कोटी ६३ लाख रुपये रोख आणि मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीकडून अटकेची धमकी देऊन ही टोळी या विकासकाकडून खंडणी उकळत असल्याचा आरोप आहे. गुन्हे शाखेला भगत याच्या घरातून त्यांच्याकडून ईडीकडून तपास सुरू असलेल्या अनेक प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे आढळली आहेत. ते अनेक व्यावसायिकांना ईडीची धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी उकळत असत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा