29.4 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरविशेषमराठा आरक्षणासाठी तरुणाची विष घेऊन आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तरुणाची विष घेऊन आत्महत्या

चिठ्ठीत लिहिले आत्महत्येचे कारण

Google News Follow

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना अधिवेशनातही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आत्महत्यांचे सत्रही सुरूच आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच ‎‎विष‎ ‎घेऊन आत्महत्या ‎‎केल्याने खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष)‎‎ येथे एका ३९ वर्षीय मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या तरुणाने छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच ‎‎विष‎ ‎घेऊन आत्महत्या ‎‎केल्याने खळबळ उडाली आहे. बुधवार, १३ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. विजय ‎पुंडलिक राकडे (वय ३९ वर्ष, खामगाव, फुलंब्री) असे मराठा‎ आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ‎तरुणाचे नाव आहे.‎

माहितीनुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात विजय देखील सहभागी होता. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो चिंतेत होता. याच चिंतेत त्याने बुधवारी खामगाव येथील छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतले. त्याने विष घेतल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला‎ तत्काळ खासगी वाहनातून फुलंब्री येथे‎ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला ‎रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती‎ संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात ‎दाखल करण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

हे ही वाचा:

संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन होणार

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मोठा निर्णय

‘प्रेक्षक पाससाठी घुसखोर सातत्याने सेक्रेटरीच्या संपर्कात’

काश्मीर मध्ये धावणार वंदे भारत

मराठा‎ आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी देखील त्याच्या खिशात आढळून आली आहे. विजय याने आत्महत्या करण्यापूर्वी एका सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की, “माझ्या‎ मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी मी‎ पूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या‎ मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात‎ त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही‎. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण‎ मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत ‎आहे,” असे सुसाईड नोटमध्ये लिहण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा